आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Do Social Work By Sangh Teaching CM Devendra Fadanvis

संघाच्या शिकवणीनुसार देशहित साधण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘मी स्वयंसेवक आहे. संघ हे माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे. संघाने दिलेल्या शिकवणीनुसार देशहित डोळ्यापुढे ठेवून समाजातील सर्व घटकांचा विकास साधण्याचे आपले प्रयत्न राहतील,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकाळी रेशीमबाग येथे जाऊन डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले. यानिमित्ताने आयोजित छोटेखानी समारंभात संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक राम हरकरे, नागपूर महानगर संघचालक डॉ. दिलीप गुप्ता यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी फडणवीस यांनी संघाने दिलेली देशप्रेमाची शिकवण आपल्या सामाजिक व राजकीय जीवनात महत्त्वाची ठरत असल्याचे सांगितले.
देशहित डोळ्यापुढे ठेवून समाजातील सर्व घटकांचा विकास साधण्याचा मंत्र संघाने दिला. त्यानुसार आपली वाटचाल राहणार असून सर्वांच्या प्रेमानेच या पदावर पोहोचू शकलो, असे फडणवीस म्हणाले. नागपूरचे महापौर प्रवीण दटके यांच्यासह संघाचे स्वयंसेवक व नागरिक मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.