आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Justic In Country, Then Asaaram Bapu Release Dr. Subramanyam Swamy

देशात न्याय असेल तर आसाराम बापू सुटतील - डाॅ. सुब्रमण्यम स्वामी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘आसाराम बापू यांच्याविरुद्धची केस बनावट आहे. त्यांना कधीतरी अशा प्रकरणात अडकवायचेच असे ठरवून हा कट रचण्यात अाला अाहे. मात्र या देशात न्याय असेल तर आसाराम बापूही सुटतील,’ असा विश्वास ख्यातकीर्त विधिज्ञ आणि भाजपचे ज्येष्ठ नेते डाॅ. सुब्रमण्यम स्वामी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

‘मी आसाराम बापू यांचा भक्त नाही वा त्यांच्या आश्रमाशीही संबंधित नाही. पण त्यांच्या विरोधात कट रचून त्यांना अडकवण्यात आले हे मात्र खरे. म्हणून मी त्यांची केस घेतली,’ असा खुलासा करायलाही डाॅ. स्वामी विसरले नाहीत. ‘केंद्रात पहिल्यांदाच राष्ट्रभक्तांचे सरकार आले आहे. या सरकारला श्वास घेण्याचीही फुरसत नाही, इतक्या वेगाने सरकार काम करीत आहे,’ असे गाैरवाेद‌्गारही त्यांनी माेदी सरकारबाबत काढले.

‘राममंदिरासाठी घाई करण्याची गरज नाही. हा खटला सर्वोच्च न्यायालयात असून ताे अाम्ही नक्कीच जिंकू,’ असा विश्वास व्यक्त करतानाच ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळालाच पाहिजे, प्रसंगी त्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणू’, असा इशाराही डाॅ. स्वामी यांनी दिला.