आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Party Orderd Then Loksabha Election Contest, Ajit Pawar Cleared

पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढवू, अजित पवार यांची स्पष्टोक्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी अमरावतीत स्पष्ट केले. जिल्हा प्रारूप आराखड्याच्या बैठकीसाठी अमरावतीत आले असता, ते पत्रपरिषदेत बोलत होते.
राज्यातील काही मंत्र्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये विचारमंथन सुरू आहे. याबाबत अजित पवार यांना विचारले असता, लोकसभाच काय, पक्षाने आदेश दिल्यास कोणतीही निवडणूक लढण्यासाठी मी तयार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या नावाचा लोकसभेसाठी गांभीर्याने विचार सुरू असल्याचे जाहीर केले आहे.
टोलमुक्त राज्य केले, तर आर्थिक भार सरकारवरच...!
राज्यात महायुतीचे सरकार आले तर राज्य टोलमुक्त करू, असे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर केले आहे. याबाबत अजित पवार यांना विचारले असता, ते म्हणाले की, राज्यात भाजप-सेनेचे सरकार असताना त्यांनीच टोल लागू केला. मुंबईत 55 उड्डाणपूल, पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवे, कन्याकुमारी-काश्मीर मार्ग या सर्व मार्गांवर युतीनेच पथकर सुरू केला. राज्यात टोल रद्द केला, तरी सरतेशेवटी टोलच्या माध्यमातून मिळणा-या महसुलाचा भार सरकारवरच पडणार आणि राज्य सरकारला टोल रद्द केल्यानंतर हा अतिरिक्त आर्थिक भार पेलवणार का, असा सवाल त्यांनी केला. पंधरा वर्षे युतीचे नेते हे राज्याच्या सत्तेत नव्हते आणि आता सत्तेत येण्यासाठी चाललेली ही त्यांची धडपड आहे, असेही पवार म्हणाले. ज्या ठिकाणी टोलवसुली पूर्ण झाली आहे, असे नाके आम्ही बंद करत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.