आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If We Came In Power ,we Will Cancel Fdi : Rajnath Singh

सत्तेवर आल्यास एफडीआय रद्द करू : राजनाथ सिंह

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर - ‘केंद्रातील यूपीए सरकारने थेट परकीय गुंतवणुकीचा (एफडीआय) निर्णय लादल्याने छोट्या व्यापा -या चे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. आगामी निवडणुकीत ‘तुम्ही राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार निवडून द्या, आम्ही तत्काळ ‘एफडीआय’चा निर्णय रद्द करू,’ असे आश्वासन भाजपचे राष्‍ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी सोमवारी दिले.

पक्षाच्या अध्यक्षपदी दुस -या दा निवड झाल्यानंतर राजनाथसिंह सोमवारी प्रथमच महाराष्‍टात आले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे भाजपच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यास त्यांनी मार्गदर्शन केले. या वेळी पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेतक-याकडे दुर्लक्ष
केंद्रातील मनमोहनसिंग सरकारवर टीका करताना राजनाथसिंह म्हणाले की, यूपीए सरकारने दोन्ही टर्ममध्ये केवळ बड्या उद्योजकांच्या हिताचे निर्णय घेतले व शेतक -या च्या प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष केले. या सरकारने ‘एफडीआय’चा निर्णय लादला. हा निर्णय लागू झाल्यास देशभरातील लाखो किरकोळ व्यापा-याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. म्हणूनच आम्ही त्याला विरोध केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्रात रालोआचे सरकार आल्यास सर्वप्रथम आम्ही हा निर्णय रद्द करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

रोजगार हमी योजनेत कृषीचा समावेश करणार
रालोआचे सरकार आल्यास महात्मा गांधी राष्‍ट्रीय रोजगार हमी योजनेत शेतीविषयक कामेही समाविष्ट केली जातील. प्रत्येक जिल्ह्यात खते-बियाणे तपासण्याच्या प्रयोगशाळा उभारल्या जातील. खते, बियाण्यांच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाही उभी केली जाईल, जेणेकरून शेतक-याची लूट थांबेल, असा विश्वासही राजनाथसिंह यांनी व्यक्त केला.
शेतकरी आत्महत्यांना आघाडीच जबाबदार
रालोआ सरकारच्या काळात आपण कृषिमंत्री होतो. तेव्हा शेतक-याच्या फायद्याची कृषी विमा योजना आखली होती. मात्र ‘यूपीए’ सरकारने ही योजना अमलात आणली नाही. महाराष्ट्रातील आघाडी सरकारने विदर्भात सिंचनाच्या योजना पूर्ण केल्या नाहीत त्यामुळेच या भागात शेतक -या च्या आत्महत्या वाढत आहेत. कृषी उत्पादनांना योग्य भाव देण्यात केंद्र व राज्यातही सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोपही सिंह यांनी केला.