आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IIIT Will Built Up In Nagpur Say Central Government

आयआयआय-टी हाेणार नागपुरात; केंद्राची माेहाेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नागपुरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीवर (आयआयआय-टी) शिक्कामोर्तब केले. आयआयएमनंतर नागपुरात ही दुसरी मोठी शिक्षण संस्था साकारेल.

विदर्भ-मराठवाड्याचा बरोबरीने विकास करायचा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत असले तरी प्रत्यक्षात महत्त्वाच्या संस्था विदर्भातच नेण्याचा त्यांचा कल पुन्हा स्पष्ट झाला. २०१३ मध्ये नागपूरसाठी आयआयआयटीची घोषणा झाली होती. एनडीए सरकार येताच नागपूरसाठी आयआयएम आणि एम्ससारख्या संस्थांची घोषणा व कामही सुरू झाले.


२५ जुलै २०१४ रोजी केंद्राच्या चमूने आयआयआयटीसाठी वर्धा मार्गावरील वारंगा गावाशेजारी ३९.९६ हेक्टर जमिनीची पाहणी केली. तसा प्रस्ताव राज्याने केंद्राला पाठवला. त्यावर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शिक्कामोर्तब केले असून, १ मे रोजी मंत्रालयाचे संयुक्त सचिव राकेश रंजन यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना पत्र पाठवले. त्यानंतर त्यांनी पुढील कामांसाठी निर्देश दिले आहेत.