आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Illegal Building Costruction Demolition In Amravati

२३ इमारतींचे अतिरिक्त बांधकाम पाडले जाणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - परवानगी न घेता अतिरिक्त बांधकाम करणार्‍या शहरातील २३ इमारत धारकांना मनपाने नोटीस धाडल्या आहेत. या सर्वांचे बांधकाम तडकाफडकी पाडण्याचे आयुक्तांचे निर्देश असल्याने संबंधितांनाही धडकी भरली आहे.

दुसरीकडे आयुक्तांच्या या धडाकेबाज भूमिकेमुळे शहरातील िबल्डर लॉबी दणाणली असून, येथून पुढे बेकादेशीर बांधकामे होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. परवानगी घेतली त्यापेक्षा जास्त बांधकाम केल्याच्या तक्रारींच्या आधारे मनपाने २३ जणांना नोटीस बजावल्या आहेत. यामध्ये झोन दोन चारच्या प्रत्येकी सहा, झोन एकच्या पाच आणि झोन पाचच्या तीन इमारतधारकांचा समावेश आहे.

बेकायदेशीर बांधकामाच्या संदर्भात मनपाला नेहमीच तक्रारी प्राप्त होत असतात. नागरिकांच्या अशाच तक्रारींच्या आधारे या सर्व जणांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या सर्व इमारतधारकांना यापूर्वीही सूचना देण्यात आल्या होत्या; परंतु निर्धारित वेळेत स्पष्टीकरणाचा कोणताही पर्याय त्यांनी निवडला नाही. परिणामी, अतिरिक्त बांधकामे तडकाफडकी पाडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

२०तक्रारींचा झाला निपटारा : सजगनागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार, मनपाकडे एकूण ४३ प्रकरणे दाखल झाली होती. त्यांपैकी २३ जणांना नोटीस धाडण्यात आल्या असून, २० तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. िनपटारा झालेल्या तक्रारींमध्ये सर्वाधिक नऊ झोन एकच्या असून, झोन दोनच्या चार, झोन तीनच्या तीन झोन पाचच्या चार तक्रारींचा समावेश आहे. आयुक्तांच्या निर्णयाने अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. मागील काही दिवसांमध्ये प्रथमच महापालिकेने परवानगी घेता केलेल्या अतिरिक्त कामांविरोधात कारवाईचे आदेश दिले असून, अशा बांधकामांना अभय दिले जाणार नसल्याचे महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी स्पष्ट केले आहे. शहरातील आणखी काही अशा प्रकारच्या इमारतीही पालिकेच्या रडारवर असल्याची माहिती आहे.

नोडल एजंसीने पाठवला डाटा
अतिक्रमण,अतिरिक्त बांधकाम, बेकायदा निर्माण आदी तक्रारींच्या सोडवणुकीबाबत मनपाने नोडल एजंसी िनयुक्त केली आहे. हमालपुरा झोन तीनच्या कार्यालयातून ही एजंसी काम करते. या एजंसीने सर्व इमारतींची पडताळणी केली असून, कारवाईयोग्य इमारतींची यादी अतिक्रमण विभागाला सोपवली आहे.

आणखी दीडशे इमारती ‘रडार’वर
नागरिकांच्या तक्रारीनुसार, २३ इमारतधारकांना नोटीस धाडल्यानंतर आणखी दीडशे इमारती ‘रडार’वर आल्याची मनपा प्रशासनाची माहिती आहे. या इमारतींची पाहणी मनपाच्या यंत्रणेने केली असून, त्या िठकाणी परवानगीपेक्षा जादा बांधकाम केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आगामी काळात या इमारतधारकांविरुद्धही कारवाई केली जाणार आहे.