आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षक सहकारी बँकेत नियमबाह्य पदभरती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - दि अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेत नियमबाह्य पदभरती होत असल्याचा आरोप करून भरतीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी बँकेच्या नऊ संचालकांनी विभागीय सहनिबंधकांकडे केली आहे.

बिंदुनामावलीचे शासकीय नियम डावलून बँकेत पदभरती होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यासाठी बँकेचे संचालक किरण पाटील, किशोर मुंडे, गजानन खोपे, उमेश गोदे आदी संचालकांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. बँकेतील 14 पदे भरण्यासाठी अध्यक्षांनी प्रस्ताव सादर केला आहे. याअंतर्गत आठ शिपाई, तीन वरिष्ठ लिपिक व प्रत्येकी एक सहायक अधिकारी, कनिष्ठ लिपिक व ज्येष्ठ टंकलेखकांच्या पदांचा यात समावेश आहे. दरम्यान, संबंधित पदे पदोन्नती व सरळ सेवा भरतीने भरली जावीत, अशी मागणी संचालकांनी केली आहे; परंतु याबाबतची माहिती अध्यक्षांनी संचालक मंडळाच्या बैठकीत दडवून ठेवून संचालकांना अंधारात ठेवल्याचा आरोप संचालकांनी केला आहे. एकूणच प्रक्रियेत संचालकांना विश्वासात घेण्यात न आल्याचा त्यांचा आक्षेप आहे. तो दूर करण्याची त्यांनी मागणी केली आहे. नियमबाह्य भरतीसाठी खातेदारांच्या पैशांची उधळपट्टी करून सत्ताधार्‍यांनी न्यायालयात ‘कॅव्हेट’ दाखल केल्याचे संचालकांचे म्हणणे आहे. या भरतीला स्थगितीसाठी या संचालकांनी विभागीय सहनिबंधकांकडे तक्रार दाखल केली आहे. पत्रपरिषदेला अरविंद बनसोड, ज्ञानेश्वर सावरकर, शरद काळे आदी संचालक उपस्थित होते.
पदभरती नियमामुसारच
बँकेतील पदभर्ती ही नियमानुसारच सुरू असून यासाठी कायदेशीर परवानगी घेतली गेली आहे. संचालक मंडळातील काही संचालक या बाबीला विरोध करत असतील, तर ती त्यांची वैयक्तिक बाब आहे.
विलास देशमुख, अध्यक्ष, दि जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँक