आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Nagpur, Hotel Mangement Student Committed Suicide

नागपुरात हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - दोन दिवसांपूर्वी पवई आयआयटीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असताना नागपुरातील हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याने शासकीय वसतिगृहातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली.

उमेश शेलकर (२४ रा. उमरेड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. उमेश हा तिरपुडे हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयात तृतीय सेमिस्टरला असून, दीक्षाभूमी चौकातील संत चोखामेळा शासकीय वसतिगृहात राहत होता. शिक्षणादरम्यान प्रशिक्षणासाठी तो नागपुरातील बड्या हॉटेलमध्ये नोकरी करत होता. प्रथम सेमिस्टरमध्ये उमेश काही विषयात नापास झाला होता. आपण अनुत्तीर्ण झाल्याची माहिती आईवडिलांना कळल्यास ते नाराज होतील, या विचाराने तो गेल्या १५ दिवसांपासून तणावात होता. सोमवारी रात्री विद्यार्थी झोपल्यानंतर वसतिगृहाच्या छतावर जाऊन त्याने पाण्याच्या टाकीच्या लोखंडी रॉडला दुपट्टा बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.