आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India Go With Friend Nation Against China, Rashtriyasevika Committee Expection

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मित्रदेशांबरोबर भारताने चीनविरोधी नेतृत्व करावा, राष्‍ट्रसेविका समितीची अपेक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - आशियातील मित्रदेशांना एकत्रित करून भारताने चीनविरोधी धोरणाचा पुरस्कार करावा तसेच चीनविरोधातील देशांचे नेतृत्व करावे, असा ठराव राष्‍ट्रसेविका समितीच्या बैठकीत करण्यात आला.
राष्‍ट्रसेविका समितीची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा आणि राष्‍ट्रीय कार्यकारिणीची बैठक 5 ते 8 जुलैदरम्यान नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथे घेण्यात आली. या बैठकीत झालेल्या ठरावांची माहिती बुधवारी समितीच्या प्रचारप्रमुख शांताक्का यांनी दिली. भारताला चीनपासून धोका आहे. चीनच्या कटकारस्थानांचा आंतरराष्‍ट्रीय पातळीवर पर्दाफाश करण्यात यावा, चीनची लष्करी क्षमता पाहता भारताने पुरेसे संरक्षणसज्ज झाले पाहिजे, भारतीय बाजारपेठेतील चिनी उत्पादनांवर बंदी घालण्यात यावी, संवेदनशील क्षेत्रात चिनी नागरिकांना प्रवेश नाकारण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या. उत्तराखंडमधील नैसर्गिक संकटांवर सखोल चर्चा झाली. अशी संकटे पुन्हा उद्भवणार नाहीत, यासाठी सरकारने काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.


महिला सुरक्षेसाठी योजना
देशात महिला सुरक्षित नाहीत. त्यामुळे राष्‍ट्रसेविका समितीने वर्षभरात महिला सुरक्षा योजना राबवण्याचे ठरवले आहे, अशी माहितीही शांताक्का यांनी दिली. या योजनेत देशभरात महिला आत्मसुरक्षा शिबिरांचे आयोजन केले जाईल. त्याच वेळी कुटुंबसंस्था सुदृढ व्हावी, यासाठी संस्कार केंद्राच्या माध्यमातून उपक्रम राबवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.