आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व सिंचन प्रकल्पांच्या चौकशीचे आदेश:सीएम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘सिंचन घोटाळ्याच्या चौकशीबाबत चुकीची माहिती पसरवली जात असून सर्वच सिंचन महामंडळातील प्रकल्पांच्या चौकशीचे आदेश एसीबीला देण्यात आले आहेत,’ असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरात घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना केला.

नागपुरातील धरमपेठ शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री बोलत होते.
लाचलुचतपत प्रतिबंधक विभागाने ज्या ज्या परवानग्या मागितल्या त्या त्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले, एकाच महामंडळातील प्रकल्पांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले हे खरे नाही. यासंदर्भात चुकीची माहिती पसरवली जात आहे.प्रत्यक्षात सर्वच महामंडळांतील प्रकल्पांच्या चौकशीचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.