आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात आंतरराष्ट्रीय देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश, रशियन युवतीसह चौघांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - उच्चभ्रू समाजातील लोकांना जाळ्यात ओढून देहविक्री व्यवसायातून पैसे उकळणा-या आंतरराष्ट्रीय देहविक्री रॅकेटचा नागपूर पोलिसांनी सोमवारी पर्दाफाश केला. यात एका रशियन युवतीसह चौघांना अटक केली अाहे.
देहविक्री व्यवसायात विदेशी युवतींना मोठी मागणी आहे. त्यामुळे मुंबईतील आंतरराष्ट्रीय दलाल राजनकुमार हा फेसबूक, टि्वटर आणि इतर माध्यमातून विदेशातील गरजू आणि भारतात पर्यटनासाठी येणा-या मुलींना हेरतो आणि त्यांना पैशाचे आमिष दाखवून देहविक्री व्यवसायात ओढतो. काही महिन्यांपूर्वी पर्यटन व्हिसा संपलेल्या आणि अडचणीत सापडलेल्या रशियाच्या पेट्रोवर्ड शहराची निवासी २८ वर्षीय युवतीला त्याने हेरले आणि तिला देहविक्री व्यवसायात ओढले. गेल्या काही दिवसांपासून ती मुंबई, बंगळुरू आणि पुणे शहरात उच्चभ्रू सोसायटींमध्ये देहविक्रीचा व्यवसाय करायची. काही दिवसांपूर्वी राजेश रमेश ईखर ऊर्फ राजू ऑटोवाला (२५) याच्या संपर्कातून ती नागपुरात दाखल झाली. राजेशने नागपुरातील हिंगणा
पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इसासनी येथे एका फ्लॅटमध्ये थांबवले होते. राजेश ग्राहकांशी पैशाची बोलणी करून इसासनी येथे पाठवायचा. याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून पंटरच्या मदतीने रात्री ९.३० च्या सुमारास धाड टाकली. त्या वेळी रशियन मुलीसह मुंबई येथील निवासी मुलगी आणि दलाल राजेश सापडला. पोलिसांनी राजेशला अटक करून दोन्ही मुलींना ताब्यात घेतले आहे.