आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Invalid Money Lender Wife husband Arrested, Action Taken By New Law

अवैध सावकारी करणा-या शर्मा दांपत्याला अटक,नव्या सावकारविरोधी कायद्याने पहिला गुन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राज्यात नवीन सावकारी अध्यादेश लागू झाल्यानंतर अवैध सावकारीचा पहिला गुन्हा धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) येथील सावकार संतोष धुलिचंद शर्मा आणि पत्नी दयालिनी शर्मा यांच्याविरुद्ध दाखल करून या दांपत्याला अटक करण्यात आली आहे. संतोष शर्मा अवैध सावकारी करीत असल्याची तक्रार संजय चौधरी (रा. अंजनसिंगी) यांनी पोलिसात दाखल केली होती. चौधरी यांनी 18 मार्च 2000 रोजी शर्मा यांच्याकडून दहा हजार रुपये व्याजाने घेतले होते. सुरुवातीलाच हजार रुपये व्याजाचे कापून नऊ हजार रुपये चौधरी यांना देण्यात आले होते. तसेच चौधरी यांचा प्लॉट गहाण ठेवला होता.
कालांतराने चौधरी प्लॉट सोडवण्यासाठी गेले असता, सावकाराने प्लॉटची विक्री केल्याचे चौधरी यांना सांगितले. या प्रकरणात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर चौधरी यांनी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान, शर्मा यांच्याविरोधात श्याम देशमुख, दिलीप तरोणे, सुमन जरे यांनीही अशाच तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन सहायक निबंधक ज्योती मलिये यांनी शर्मा यांच्या घरी छापा टाकून 17 सात-बारा उतारे, कोरे स्टँप पेपर, विविध रकमांचे धनादेश व कर्जदारांच्या नावे असलेले अनेक खरेदीखत आढळून आले. त्यामुळे ज्योती मलिये यांनी बुधवारी शर्मा दाम्पत्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. संतोष शर्मा यांना बुधवारी रात्री तर दयालिनी शर्मा यांना गुरुवारी अटक करण्यात आली.