आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Invasive Protests By Various Organization In Nagpur

हल्ल्याचा सर्वपक्षीयांकडून निषेध: नागपुरात काँग्रेस, आपचे कार्यकर्ते रस्त्यावर, नाशकातही रास्ता रोको

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- साम्यवादी विचारवंत व साहित्यिक गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा नागपुरात विविध संस्था-संघटनांतर्फे तीव्र निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी शहर काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष अजय पाटील व ज्येष्ठ समाजसेवक उमेश चौबे यांच्या नेतृत्वात नारे देत निदर्शने करण्यात आली. पानसरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी विधान परिषद सदस्य प्रकाश गजभिये, नगरसेविका
प्रगती पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

आम आदमी पार्टीच्या दक्षिण नागपूर शाखेतर्फे पानसरे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध फेरी काढण्यात आली. दाभोलकरांनंतर अशा प्रकारचा हा दुसरा हल्ला आहे. सरकारने पानसरे यांच्या हल्लेखोरांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी अापचे संयोजक देवेंद्र वानखेडे यांनी केली. सीपीआयने संिवधान चौकात नारे-निदर्शने करून निषेध केला. शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रभाषा प्रचार समिती सभागृहात बैठक घेऊन पानसरे यांच्या हल्लेखाेरांना अटक करण्याची मागणी केली.

नाशकात अांदाेलक ताब्यात-
कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले. पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी तसेच कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येथील मेहेर सिग्नल येथे रास्ता रोको करून या घटनेचा निषेध व्यक्त केला. नाशिकमध्ये समाजवादी संघटना, पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते आणि कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. या वेळी हुतात्मा स्मारक, शालिमार, रेडक्रॉस सिग्नल ते मेहेर सिग्नल मोर्चा काढण्यात आला होता. मेहेर सिग्नलवर पाऊण तास रास्ता रोको करण्यात अाला. दरम्यान, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
मनमाडमध्ये कामगार संघटना रस्त्यावर कॉ. पानसरे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा मनमाड येथे निषेध करण्यात अाला. माजी अामदार माधवराव गायकवाड यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध हाेते. पानसरे यांच्या परखड विचारांनी मनमाडकरांना वैचारिक भुरळ घातली हाेती. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व कामगार संघटनांनी निषेध नाेंदवला.