आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसस्थानक ते इर्विन चौकाचे अंतर वाढले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती -बसस्थानक ते इर्विन चौक, या समाधाननगरमार्गे केवळ ५०० मीटरच्या अंतरासासाठी अमरावतीकरांना एक कमिीचा वळसा घेऊन रेल्वे स्टेशन चौकातून इर्विन चौक गाठावा लागत आहे.

समाधाननगर मार्गावर सध्या काम सुरू असल्यामुळे वाहनचालकांची चांगलीच कोंडी होत आहे. एरव्ही बसस्थानकातून इर्विन चौकात जाण्यासाठी खापर्डे बगीचा मार्गाचा उपयोग करण्यात येतो. मात्र, मागील चार महिन्यांपासून या मार्गावरील पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहनचालक इर्विन चौकात जाण्यासाठी समाधाननगर मार्गाचा उपयोग करायचे. या मार्गाने बसस्थानक ते इर्विनचे अंतर केवळ ५०० मीटरचे असल्यामुळे तो सोयीस्कर होता. मात्र, दोन दविसांपासून या मार्गाचेही काम सुरू झाले. त्यामुळे वाहनचालकांना आता रेल्वे स्टेशन चौक, मर्च्युरी टी पॉइंटमार्गे इर्विन चौक गाठावा लागतो आहे. त्यामुळे, नागरिकांना एक किलोमीटरचा वळसा पडत आहे. संबंधित काम कतिी दविस सुरू राहणार, याची काहीच कल्पना नागरिकांना नाही. हेे काम सुरू असेपर्यंत अमरावतीकर वाहनचालकांना बसस्थानक ते इर्विन चौकाचे अंतर गाठण्यासाठी एक किलोमीटरचा वळसा घेण्याशविाय पर्याय दृष्टिपथात नसल्याचे दिसत आहे.
रस्ता बंदचा फलकही लावला चुकीच्या ठिकाणी
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इमारतीपासून समाधाननगरमार्गाने बसस्थानकावर पोहोचता येते. या मार्गावर बसस्थानकाच्या दशिेने काम सुरू आहे. अशावेळी दोन्ही बाजूला प्रारंभीच रस्ता बंद असल्याचे रस्त्याच्या दोन्ही कडेने संबंधति यंत्रणेकडून फलक लावणे अपेक्षति आहे. मात्र, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाजूने फलक लावलेले नाहीत. परिणामी, ३०० मीटर आतमध्ये आल्यानंतर काम सुरू असल्याचे दिसते. वाहनचालकास येथपर्यंत पोहोचेपर्यंत याबाबत मािहती नसल्यामुळे, उगाच आलो, अशी त्यांची भावना होते.
गर्ल्स हायस्कूल चौकातही वाहतुकीला अडथळा
गर्ल्स हायस्कूल चौकात मागील काही दविसांपासून चौकाच्या मधोमध काम सुरू आहे. या कामांमुळे रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. वाहनचालकांना झिकझॅक पद्धतीने वाहन चालवणे भाग पडत आहेत.