आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ishrat Jaha Case Probing Officer Get Life Threat

इशरत जहाँ प्रकरणातील तपास अधिका-यास जीवे मारण्‍याची धमकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणाचा तपास करणारे सीबीआय अधीक्षक संदीप तानगाडगे यांना सतत मिळणा-या जीवे मारण्याच्या धमकीमुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तानगाडगे यांच्याकडे मुंबई गुन्हे शाखा व अहमदाबाद येथील विशेष तपास पथकाचा अतिरिक्त कार्यभार आहे.


15 जून 2004 रोजी अहमदाबाद शहराबाहेर इशरत व अन्य तिघांची बनावट चकमकीद्वारे हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास तानगाडगे यांच्याकडे देण्यात आला. तपास अंतिम टप्प्यात असून 7 जुलै रोजी आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. यादरम्यान तानगाडगे यांना अज्ञात व्यक्तींकडून वारंवार जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. सुरुवातीस त्यांनी दुर्लक्ष केले, मात्र सतत मिळणा-या धमक्यांची माहिती त्यांनी सीबीआय संचालक रणजित सिन्हा यांना दिली. यानंतर सिन्हा यांनी राज्याच्या गृह विभागाला पत्र पाठवून तानगाडगे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे तपास पथकातील अन्य अधिकारी, कर्मचा-यांनाही सुरक्षा पुरवण्याची मागणी केली.
तानगाडगे यांना सशस्त्र सुरक्षा रक्षकांची सुरक्षा पुरवण्यात आली असून निवासस्थान परिसरातही बंदोबस्त वाढविला आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त के. के. पाठक यांनी दिली. सुरक्षेबाबत पोलिस महासंचालक व पोलिस आयुक्तांशी चर्चा करण्यात आल्याचे तानगाडगे यांनी सांगितले.