आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देण्याचे सुख : गरजूंसाठी ज्ञानाची झोळी रिती करणारा माणूस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - ‘अहो गेल्या वर्षीची काही पुस्तके, नोटबूक, कपडे द्या ना राव,’ असं म्हणत मराठवाडा, विदर्भातील हॉस्टेल, विद्यापीठ, कॉलेज परिसर पायाखाली घालत मिळेल त्या साहित्याचे गाठोडे पाठीवर घेऊन गोरगरिबांच्या हुशार विद्यार्थ्यांच्या गावची बस पकडणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे शेगावचे पांडुरंग तुळशीराम पांडे. त्यांनी नुकतीच भातकुली तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना मदत केली. ते पी. टी. पांडे नावाने परिचित आहेत.

शेगावच्या आठवडी बाजाराच्या परिसरात राहणारे पी. टी. सध्या हिंगोलीच्या एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पत्रकारितेचे धडे देतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ते पत्रकारितेत एम.फील. करीत आहेत. कामानिमित्त विविध ठिकाणी गेल्यानंतर त्यांचा मुक्काम हॉस्टेल किंवा कुण्या शिक्षकाच्या घरीच असतो. समीक्षेसाठी आलेली पुस्तके, नवलेखकांचे प्रकाशित साहित्य, विद्यार्थ्यांचे जुने बूट, कपडे, मुदत न संपलेली औषधे पांडे गोळा करतात व ग्रामीण भागातील नव्यानं सुरू झालेली ग्रंथालये, शाळा, गरीब विद्यार्थ्यांना गरजेनुसार वितरित करतात. अपंग, महिला व कामगारांसाठीही आवश्यक साहित्य ते दान करतात. जातील तेथे ज्ञानाची, दानाची झोळी रिती करणारे पांडे यांना डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद राष्ट्रीय पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

पुढील स्लाइडमध्ये, अन् ‘देण्याचे हात’ मजबूत होतात