आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

के. एल. महावदि्यालयाला १९ वर्षांखालील जेतेपद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - प्रत्युष टवानी, यश राठी यांच्या वेगवान खेळाच्या बळावर के. एल. महावदि्यालयाने जलि्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत ब्रजलाल बियाणी महावदि्यालयाचा ३-१ ने फज्जा उडवून मुलांच्या १९ वर्षांखालील गटाचे जेतेपद पटकावले. जलि्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे विभागीय क्रीडा संकुलात आयोजित या स्पर्धेतील १९ वर्षांखालील शहर गटाच्या अंतमि सामन्यात के. एल. महावदि्यालयाच्या प्रत्युष टवानीने एकेरीत ब्रजलाल बियाणीच्या मिहीर देसाईचा ११-७, ७-११, ११-७, ११-५ ने पाडाव केला.

दुसऱ्या लढतीत यश राठीने तन्मय गंगवालला ११-९, ११-४, ११-८ ने नमवले. मात्र, तिसऱ्या सामन्यात सन्मित राठीला ब्रजलाल बियाणीच्या संकेत मेश्रामकडून खळबळजनकरीत्या ११-१३, २-११, ९-११ ने पराभव सहन करावा लागला. यानंतर परतीच्या सामन्यात प्रत्युष टवानीने तन्मय गंगवालवर ११-८, ८-११, ११-२, ११-६ ने सहज मात केली. १४ वर्षांखालील मुलांच्या शहर गटातील उपांत्य सामन्यात गोल्डन किड्स मराठी स्कूलने राजेश्वरी हायस्कूलचे आव्हान ३-१ ने सहज मोडीत काढून अंतमि फेरीत धडक दिली. विजयी संघाकडून तन्मय गतफणे, सार्थक तभाणे आणि विश्वेश सयामने दमदार खेळ केला. पराभूत संघात अनिरुद्ध ठाकूर, राघव चांडक, देवांग ठाकरेचा समावेश होता. एच.ए. खान व मलििंद ठाकरे यांनी प्रमुख पंच म्हणून कामगिरी बघितली.
सेंट फ्रान्सिस अंतमि फेरीत उदयोन्मुख टेबल टेनिसपटू शोण ठाकरे, पार्थ ढेपे आणि चिन्मय लोकडे यांच्या भन्नाट खेळाच्या आधारे मुलांच्या १७ वर्षांखालील गटातील पहलि्या उपांत्य सामन्यात सेंट फ्रान्सिस हायस्कूलने स्कूल आॅफ स्कॉलर्सचा ३-१ ने पराभव करून अंतमि फेरीत धडक दिली. अपयशी संघाकडून मयुरेश गोखले, अनंत गांधी, यश किटे यांनी खेळ केला.
१४ वर्षांखालील ग्रामीण गटात तोमोई अजिंक्य : १४ वर्षांखालील मुलांच्या ग्रामीण गटात तोमोई इंग्लिश हायस्कूलने इंडो पब्लिक स्कूलचा ३-१ ने फज्जा उडवून जलि्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले. पहलि्या लढतीत श्रेयस नायरने इंडो पब्लिकच्या श्रवण गेडामचा ११-३, ११-५, ११-५ ने पाडाव केला. तर दुसऱ्या सामन्यात तोमोईच्या आयुष जोशीने विराज ठाकरेवर ११-७, ११-३, ८-११, १४-१२ ने मात केली. तिसऱ्या सामन्यात मात्र इंडो पब्लिकच्या यश काळेकडून तोमोईच्या आयुष कासटला ११-५, ११-६, ११-९ ने अपयश पत्करावे लागले. परतीच्या सामन्यात श्रेयस नायरने विराज ठाकरेला नमवून संघाला जेतेपद मिळवून दिले.