आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘खैरलांजीच्या माथ्यावर’चे प्रमाणपत्र रद्द

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - देशभर गाजलेल्या भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी हत्याकांडाच्या सत्य घटनेवर आधारित ‘खैरलांजीच्या माथ्यावर’ मराठी चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने दिलेले प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द ठरवले आहे.
अखिल भारतीय धम्मसेनेचे अध्यक्ष रवी शेंडे आणि भैयालाल भोतमांगे यांनी हायकोर्टात धाव घेत या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आव्हान दिले होते. ‘खैरलांजीच्या माथ्यावर’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करताना आपल्याला कोणतीही विचारणा करण्यात आली नाही, असे भैयालाल यांचे म्हणणे आहे. चित्रपटात आपल्याला दारुडा आणि भेकड दाखवले आहे. शिवाय आपल्या मुलीचीही प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप भैयालाल यांनी केला होता. संपूर्ण चित्रपटावर आक्षेप नाही. परंतु चित्रपटातील काही दृश्ये वगळण्यात यावीत, तोपर्यंत चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये, अशी
मागणी याचिकेत करण्यात आली होती.
याचिकाकर्त्यांची बाजू ऐकल्यानंतर 6 फेब्रुवारी 2014 रोजी न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. झेड. ए. हक यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगनादेश दिला होता. सर्व पक्षांचा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने 13 फेब्रुवारी रोजी प्रकरणाचा निर्णय राखून ठेवला होता. शुक्रवारी सकाळी 11 वाजता या प्रकरणावरील निकाल वाचून दाखवण्यात आला. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. जयदेव श्यामकुवर आणि मिलिंद खोब्रागडे यांनी बाजू मांडली.