आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खिलार बैलाची तीन वर्षांत कमाई 20 लाख!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- मठ्ठ व्यक्तींना समाज ‘बैलोबा’ म्हणून हिणवतो. बहुपयोगी बैल प्राणी नेहमी उपेक्षित राहिला आहे. परंतु आजच्या कॉर्पोरेट युगात गलेलठ्ठ ‘पॅकेज’ असणा-या अधिका-यापेक्षा एक बैल कुठेही कमी नसल्याचे कृषी वसंत प्रदर्शनातून स्पष्ट झाले आहे. प्रदर्शनातील एका खिलार जातीच्या बैलाने मालकाला तीन वर्षांत 20 लाखांपेक्षा अधिक कमाई करून दिली. पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील भारत किसन जलवाडे यांनी खिलार जातीचे सहा बैल प्रदर्शनात आणले आहेत. पांढ-या खिलारचा रुबाब बघून लोक त्यांच्या स्टॉलजवळ गर्दी करत आहेत. खिलार दिसायला अतिशय आकर्षक आहे.
खिलारचे उत्पन्न असे : खिलार दिसायला आकर्षक व रुबाबदार आहे. त्यामुळे असा बैल आपल्याकडे असावा अशी प्रत्येक शेतक-याची इच्छा असते. त्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून अनेक शेतकरी आपल्या गायी खिलारकडे आणतात. एका गायीसाठी हजार रुपये शुल्क आकारले जाते. दररोज अशा 3 ते 4 गायी आणल्या जातात.
दिवसाकाठी दोनदा खुराक : खपरी पेंड, भुईमुगाची पेंड, गहू, मक्याचे पीठ, सहा अंडी असा खुराक खिलारला दिवसात दोनदा आणि आठवड्याकाठी अर्धा किलो डालडा दिला जातो.
शंकरपटात मारले मैदान
खिलारने आजवर राज्यातील अनेक शंकरपटांची मैदाने मारली. चंद्रपूर व कोल्हापुरातील शंकरपटांत लाखोंची बक्षिसे जिंकली. बंगळुरू येथे सेनापती प्रगती मैदानावरील स्पर्धेत खिलारने देशभरातून आलेल्या बैलांना पराभूत करत गौरव वाढवला. जलावडेंसाठी ही महत्त्वाची स्पर्धा ठरली.