आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मला विदर्भातून निवडणूक लढवायला आवडेल :खोब्रागडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- गेल्या 20 वर्षांपासून मी दलितांसाठी काम करीत आहे. ते काम अधिक विस्ताराने करण्यासाठी लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी इच्छा आहे, असे मनोगत माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी बुधवारी व्यक्त केले.‘इतक्या वर्षांपासून दलित हितासाठी काम करीत असल्याने निवडणूक लढणे स्वाभाविक आहे. मी विदर्भातील असल्याने येथून निवडणूक लढवायला आवडेल. मात्र निवडणूक कोणत्या पक्षाकडून वा अपक्ष लढायची याबद्दल अजून काहीही ठरवलेले नसल्याचे खोब्रागडे यांनी सांगितले.