आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kidnapped Son Of Doctor Murdered By Hospital Compounder

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सूड उगवण्याच्या हेतूने युगची हत्या, नोकराचे मित्राच्या मदतीने कारस्थान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - रुग्णालयात पैशांचा अपहार केल्याच्या कारणावरून नोकरीवरून काढल्यानंतर डॉ. मुकेश चांडक यांच्यावर सूड उगवण्याच्या भावनेतून आणि खंडणी वसूल करण्यासाठी युग मुकेश चांडक या आठवर्षीय चिमुकल्याची हत्या केली, अशी कबुली दोन्ही आरोपींनी पोलिसांसमोर दिली. राजेश ऊर्फ राजू डवारे (२०) व अभिजित सिंग (१९) अशी आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने दोघांनाही १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, बुधवारी युगवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी शहरातील सुमारे १५ ते २० हजार नागरिक जमले होते. राजेश हा दंततज्ज्ञ डॉ. मुकेश चांडक यांच्या रुग्णालयात रिसेप्शनवर काम करीत होता. येणाऱ्या रुग्णांकडून तो उपचार शुल्काशविाय शंभर ते पाचशे रुपये अधिकचे वसूल करायचा. हा प्रकार चिमुकल्या युगच्या माध्यमातून उघडकीस आला होता. यामुळे डॉ. चांडक यांनी राजेशला ८ ऑगस्ट २०१४ रोजी कामावरून काढून टाकले. कामावर असताना राजेशने रुग्णालयात युगला दोन झापडाही मारल्या होत्या.

कामावरून कमी केल्याचा राग राजेशच्या मनात होता. त्याने महाविद्यालयीन मित्र अभिजितला हाताशी धरून युगच्या अपहरणाची योजना अाखली. युगच्या माध्यमातून डॉ. मुकेश यांच्याकडून १० कोटी रुपये मिळतील या लालसेतून अभिजितही त्याची मदत करण्यास तयार झाला. योजनेनुसार सोमवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास युग हा घरासमोर शाळेच्या बसमधून उतरल्यानंतर राजेशने त्याला आवाज दिला. यानंतर युगने शाळेची बॅग चौकीदाराकडे सोडून तो राजेशच्या स्कूटी पेप गाडीवर बसून निघाला. काही अंतर पुढे गेल्यानंतर अभिजितही गाडीवर बसला. रुग्णालयाचे कारण सांगून युगचे अपहरण केले होते. परंतु रुग्णालयाचा रस्ता सोडून राजेश दुसऱ्या मार्गाने गाडी घेऊन जात असल्याचे युगच्या लक्षात आले. त्याने ओरडण्याचा प्रयत्न केला असता युगच्या पाठीमागे बसलेल्या अभिजितने युगचे तोंड दाबले. सर्वत्र शोध घेऊनही युग कुठेच न सापडल्याने डॉ. मुकेश यांनी लकडगंज पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

हत्येनंतर राजेश पोलिसांसमोर हजर
खुनाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी डॉ. चांडक यांच्या रुग्णालयात काम करणाऱ्या सुमारे ४० लोकांना ठाण्यात बोलावले होते. यासाठी पोलिसांनी राजेशलाही फोन केला होता. फोनवर राजेशने पोलिस ठाण्यात हजर होण्यास होकार दर्शवला. पोलिसांच्या फोनमुळे घाबरलेल्या राजेश व अभिजितने युगला एका नाल्याखाली नेऊन गळा आवळला. यानंतर मृतदेह नाल्यातील वाळूखाली दाबून त्यावर दगड ठेवले. त्यानंतर पोलिस ठाण्यात हजर झाला.