आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kidnapping, Rape, Murder Criminal To Death Punishment At Nagpur Court

नागपूर: बलात्कार करून निर्घृण हत्या करणार्‍या आरोपींना फाशी शिक्षा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- कळमेश्वर तालुक्यातील लोणार गावातील एका 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कारानंतर तिची हत्या केल्याच्या आरोपाखाली दोन जणांना नागपूर कोर्टाने आज (शुक्रवारी) फाशीची शिक्षा ठोठावली. अमर सिंग ठाकूर आणि राकेश कांबळे असे दोषींची नावे आहेत.
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने 19 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्यानंतर दोघांना फाशीची शिक्षा सुनावली.
दरम्यान, 2005मध्ये दोन्ही नराधमांनी कांचनला तिच्या घरातून उचलून नेले होते. तिला शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. एवढेच नाही तर दोघांनी तिची निर्घृण हत्याही केली होती.
या घटनेनंतर मुख्य आरोपी अमर ठाकूर अनेक दिवस फरार होता. परंतु 2010 मध्ये पोलिसांनी त्याला जेरबंद करून त्याच्यावर मोक्का लावला होता. ठाकूरवर याआधीही एक खुणाचा गुन्हा होता.