आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गुड गव्हर्नन्स'ची बोंब, दोषींविरोधात फौजदारी दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राजकीय प्रशासकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचाराच्या उडणाऱ्या घोड्यांना लगाम बसून जनसामान्याला त्वरित न्याय मिळावा, या उद्देशाने 'गुड गव्हर्नन्स'च्या आशेने राज्यासह देशात मोठी राजकीय उलथापालथ झाली. परंतु प्रशासकीय यंत्रणेत अद्यापही 'गुड गव्हर्नन्स'च्या नावाने कशी बोंब आहे, याचा मासलेवाईक नमुना समोर आला आहे. बनावट फेरफार करून मालमत्ता हडप करणाऱ्या संबंधितांसह दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्याचे आदेश खुद्द िजल्हाधिकाऱ्यांनी दोन वर्षांपासून देऊनही त्याची अंमबजावणी कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून होऊ शकली नाही. विशेष म्हणजे, जिल्हाधिकाऱ्यांनाच याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार स्मरणपत्रे बजावावी लागत आहेत. न्यायासाठी विलंब होत असल्याने संबंधित नागरिकाला मात्र मालमत्तेचा मालक असूनही शासकीय उंबरठे झिजवावे लागत आहेत.

माणिकसा नारायणसा पवार यांची चांदुर बाजार येथे भरबाजारात घराची स्थावर मालमत्ता आहे. आज त्याची किंमत लाखोंच्या घरात आहे. त्याची १९५३ मध्ये झालेली खरेदी फेरफार पत्रकही माणिकसा यांच्याकडे अाहे. माणिकसा पवार यांना सहा मुले असून, नोकरीनिमित्त ते बाहेरगावी राहत होते. त्यामुळे पवार यांनी आपले घर नातेवाईक असलेले विजय गोपाळसा पवार यांना राहण्यासाठी दिले होते; परंतु २०१२ मध्ये विजय पवार यांनी बनावट फेरफार तयार करून चांदूर बाजार नगरपालिकेला सादर केले. यावर असलेल्या तलाठ्याचा शिक्का सही बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे. दरम्यान, संबंधित मालमत्तेला चांगला भाव असल्यामुळे ही जागा परस्पर विकून टाकली. माणिकसा यांचे घर क्रमांक ११० जुना वाॅर्ड क्रमांक १२ प्लॉट नं. ३६ ही मालमत्ता प्लॉट नं. ३५ वर असल्याचे विजय पवार यांचे म्हणणे होते. दरम्यान, मालमत्ता हडप करण्याची बाब समोर आल्याने लक्ष्मण माणिकसा पवार यांनी घर नावाने करण्यासाठी फेरफार अर्ज दाखल केला होता. त्यांनी सादर केलेले खरेदी खत, फेरफार पत्रक, तलाठ्याचा दाखला नगरपरिषदेची मालमत्ता कर सूची या अधिकृत कागदपत्रांचे अवलोकन केल्यानंतर वरील संबंधित मालमत्ता प्लॉट क्रमांक ३५ वर नसून, ती प्लॉट क्रमांक ३६ वर आहे त्यामुळे संबंधित मालमत्तेबाबत तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी घेतलेल्या नोंदीचा निर्णय रद्द करून माणिकसा पवार यांचे नावे नोंद घेण्यात यावी कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी २४ सप्टेंबर २०१२ चांदुर बाजार येथील न.प. चे तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना दिले होते; परंतु त्यानंतरही आजतागायत त्याची नोंद घेण्यास न.प. प्रशासन टाळाटाळ करीत आहे.

याप्रकरणाबाबत जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी २३ जानेवारी १३ फेब्रुवारी २०१५ रोजी िजल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी दोन वेळा स्मरणपत्रेही पाठवली आहेत. संबंधित प्रकरणात त्वरित कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयातून नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना सांगावे लागले. त्यानंतरही यावर काहीच कार्यवाही होत नाही म्हणून अखेर माणिकसा पवार यांनी पुन्हा १० एप्रिल २०१५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन न्यायाची याचना केली आहे.

पाणी कुठे मुरते?
फेरफारबनावट असल्याचे सिद्ध होऊनही माणिकसा पवार यांना न्याय मिळत नसल्याने अद्यापही पाणी कुठे मुरत आहे, असा सवाल पवार कुटुंबीयांनी केलाय. सत्य असलेली गोष्टही मान्य केली जाऊन दिलासा मिळत नसल्याने कोणत्या 'गुड गव्हर्नन्स'वर िवश्वास ठेवावा, असा सवाल माणिकसा यांची मुले िवलास रमेश यांनी केलाय. 'दिव्य मराठी' कार्यालयात येऊन दाेघांनीही आपली व्यथा मांडली.
फेरफार बनावट
विजयपवार यांनी सादर केलेला फेरफार क्रमांक १३९ २० वरील तलाठी कार्यालयामार्फत हाताने लिहिलेले फेरफार, त्यावरील तलाठ्याचे शिक्के सही बनावट असल्याचे तहसीलदार, मंडळ अधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अचलपूर उपविभागीय अधिकाऱ्यांना १९ जानेवारी २०१५ रोजी दिलेल्या पत्रात बनावट सही शिक्के कुणी केले, याची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते.

प्रकरण बघते
मीनुकतीच नगरपालिकेत नव्याने रुजू झाले आहे. संबंधित प्रकरणाबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरण पाहिल्यानंतरच याबाबत बोलणे योग्य होईल.
- मेघना वासनकर, मुख्याधिकारी, चांदुरबाजार

गुन्हे दाखल करण्याचे निर्देश
संबंधितप्रकरण तपासासाठी माझ्याकडे आले होते; परंतु प्रकरण महसूलशी संबंधित नसून नगरपालिकेशी संबंधित असल्यामुळे त्यास पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहे. त्यामुळे दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- श्यामकांत म्हस्के, उपविभागीय अधिकारी, अचलपूर