आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखभर युवक अजूनही मतदार ओळखपत्राविना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मतदान ओळखपत्र नसलेल्यांमध्ये युवकांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने जनजागृती मोहिम हाती घेण्यासोबत स्पॉट रजीस्ट्रेशनला सुरूवात केली आहे.

मेघे कॉलेजमधील कार्यक्रमाला उपजिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र धुरजड, फेथ फाऊंडेशनच्या पूजा उमेकर, अमरावतीचे एसडीओ प्रवीण ठाकरे, भातकुलीचे तहसीलदार अजीत येळे, नायब तहसीलदार रवी महाले उपस्थित होते.

त्यांनी मतदारासाठीचे वय २१ वरुन १८ का करण्यात आले, मतदारयादीत नाव असणे का आवश्यक आहे, नसल्यास काय परिणाम भोगावे लागतात, आदी मुद्यांवर प्रबोधन केले. निवडणुकीतील सहभाग हे राष्ट्रीय कार्य असल्यामुळे त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही केले. जिल्ह्यात सुमारे एक लाख , १७ हजार तरुण मतदार आहेत. यापैकी, बहुतांश महाविद्यालयीन विद्यार्थी असून त्यांच्याजवळ अजूनही मतदार ओळखपत्र नाहीत. यावेळी महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रो. इर्शाद बेग, प्रो. लोभस घडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

४०० जण मतदार बनले
स्पॉट रजीस्ट्रेशनच्या पहिल्याच दिवशी सुमारे ४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी स्वत:च्या नावांची नोंदणी केली. या विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांबद्दलची हितीती आधीच देण्यात आली होती. त्यामुळे छायािचत्रांसह भरुन घेतलेल्या या विद्यार्थ्यांना लवकरच त्यांची ओळखपत्रे िदली जाणार आहेत. विशेष असे की, हे कामही समारंभपूर्वक पूर्ण केले जाईल, असे यंत्रणेचे सांगितले आहे.

फेथ फाउंडेशनची मदत
या उपक्रमासाठी शहरातील फेथ फाऊंडेशन पुढे आली आहे. फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष पूजा उमेकर व त्यांची चमू त्यासाठी कार्यरत आहे. शहरासह जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये पोहचून तेथील विद्यार्थ्यांना जागृत करणे व मतदार होण्यासाठी प्ररित करणे हे काम या संस्थेवर सोपविण्यात आले आहे. दुपारनंतर असाच कार्यक्रम रायसोनी महाविद्यालयातही नियोिजत होता.यापुढेही उपक्रम सुरूच राहणार आहे.