आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Marathi Fire Broke In Amravati Seven Dead

अमरावतीत कापड दुकानाला आग, एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - येथील परतवाडा भागातील वृंदावन फॅशन या कापड दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
टिळक चौक भागातील रेडीमेड कापड दुकानाला शनिवारी मध्यरात्रीनंतर आग लागली. आगीचे कारण कळू शकले नाही. रेडीमेड कपड्याच्या दुकानाला प्रथम आग लागली. आगीच्या ज्वाळा एवढ्या प्रचंड होत्या की, वरच्या मजल्यावर राहात असलेले ओटवाल कुटुंबातील सात जणांचा यात होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन लहान मुले आणि दोन महिलांचा समावेश आहे.
अग्निशामक दलाचे बंब काही वेळानंतर घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी त्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. रविवारी दुपारी आग पूर्णपणे विझविण्यात यश आले.