आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Latest News In Marathi Teleshopping Advertisement Superstation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धार्मिक टेलिशॉपिंगद्वारे अंधश्रद्धेला खतपाणी, खंडपीठात आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - विविध चॅनल्सच्या माध्यमातून टीव्हीवर प्रसारित होणार्‍या धार्मिक टेलिशॉपिंगच्या जाहिरातीतून अंधश्रद्धा पसरवण्यात येते, अशा आशयाची रिट याचिका वाशीम येथील वकील गीतेश पांडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली.
या याचिकेवरील प्रारंभिक सुनावणीनंतर न्या. भूषण गवई आणि न्या. एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठाने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव, राज्याचे गृह सचिव, समाजकल्याण सचिव, मुंबई-नागपूर पोलिस आयुक्त, भारतीय जाहिरात दर्जा परिषद, इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशन, सहारा, सोनी, झी टीव्ही, अशा विविध चॅनल्सला नोटीस बजावली असून, तीन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले.

समाजातील अंधश्रद्धेचे निर्मूलन करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विविध कायदे केले आहेत. अशात विविध टेलिशॉपिंगच्या धार्मिक जाहिरातींमधून चमत्कार घडवण्याचे प्रलोभन दाखवण्यात येते. यात प्रामुख्याने हनुमान कवच, रुद्राक्ष, धनलक्ष्मी यंत्र आदी जाहिरातींचा समावेश आहे. अशा जाहिरातींतून अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यात येत असून, त्यावर केबल नेटवर्किंग अ‍ॅक्ट आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार बंदी आहे. अशा जाहिराती करणार्‍या कंपन्या, जाहिरातींमध्ये काम करणारे कलावंत, टीव्ही चॅनेल्स आणि संबंधित व्यक्तींविरुद्ध कारवाईची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.