आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थरांचा थरथराट अन् उत्साहाला अाले उधाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - चकाकणारं ऊन, त्यात अंगावर उडणारे पाण्याचे गार तुषार, डीजेच्या तालावर थिरकणारी चिंब भिजलेली तरुणाई, मध्येच दर्शकांची दाद मिळवून जाणाऱ्या लावणी, नृत्याचे सादरीकरण. असा चैतन्य, जल्लोष व साहसाचा उत्सव शुक्रवारी (दि. २२) नेहरू मैदान येथे पहायला मिळाला. येथे झालेल्या दहीहंडी स्पर्धेत गोविंदांनी थरांचा थरथराट दाखवून अमरावतीकरांची मने जिंकून घेतली. धामणगाव रेल्वे येथील आदर्श ग्रुपच्या गोविंदांनी २६ फूट उंच दहीहंडी पाच मिनिटे ५९ सेकंदांत फोडून विजयाची माळ गळ्यात घातली.
प्रवीण पोटे पाटील मित्र मंडळ व पी. आर. पोटे पाटील ग्रुप ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट स्टुडंट फोरम यांच्या वतीने शुक्रवारी नेहरू मैदान येथे दहीहंडी स्पर्धा घेण्यात आली. शहर, जिल्ह्यांतील गोविंदांचा या स्पर्धेत सहभाग होता. सहभागी गटांनी थरावर थर रचत उपस्थितांच्या नजरा खिळवून ठेवल्या. सुबोध मेश्राम मंडळ, पुणे येथील कलाकारांनी लावणी व नृत्य सादर करून तरुणाईचा भरगच्च प्रतिसाद मिळवला.
सुरक्षेबाबत घेतली काळजी
उत्सवाच्या ठिंकाणी कोणतीही दुर्घटना होऊ नये, याची काळजी घेण्यात आली. थर लावताना खाली पडल्यावर गोविंदांना दुखापत होऊ नये यासाठी वाळलेले गवत व त्यावर जाड चटई टाकून पृष्ठभाग नरम करण्यात आला होता. घटनास्थळावर अॅम्ब्युलन्सची व्यवस्थाही करण्यात आली होती. या प्रसंगी दिवसभर जिंल्ह्यातील मान्यवरांची उपिस्थती हाेती.
‘अमिताभ’ने जिंकली मने
‘अरे अमिताभ बच्चन साहब भी आ गए’ असे म्हणत बघ्यांच्या नजरा व्यासपीठाकडे वळल्या. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासारखी वेशभूषा, केशभूषा, चाल आणि आवाज घेऊन व्यासपीठावर आलेले कलाकार शशिकांत पेडवाल यांनी उपस्थितांची मने जिंकली. बच्चन यांची नक्कल करत त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रम सादर केला.
चोख बंदोबस्त
अनुचित प्रकार घडू नये यासाठी उत्सवात पोलिसांचा बंदोबस्त होता. नेहरू मैदानमध्ये येणाऱ्या दोन्ही रस्त्यांवर पोलिस तैनात होते. बघ्यांची गर्दी नियंत्रणाबाहेर जाऊ नये, यासाठी बॅिरगेड्सही हाेते.