आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Let's Wait For Kelkar Committee Report: Prithviraj Chavan On Vidarbha

आधी दांडेकर आता केळकर समितीच्या अहवालाची प्रतीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - विदर्भाचा अनुशेष निश्चित करण्यासाठी यापूर्वी दांडेकर समिती नेमण्यात आली होती. दांडेकर समितीने काढलेला अनुशेष भरण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता नव्याने नेमलेल्या केळकर समितीचा अहवाल लवकरच येईल. त्यानंतर अनुशेषाबाबत सर्वजण एकत्र बसून मार्ग काढू, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या बैठकीनंतर पत्रपरिषदेत ते बोलत होते.

सध्या मंदीची लाट असल्यामुळे मिहानचा विकास मंदावला आहे, पण लवकरच मिहानच्या विकासाला वेग देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. भू-संपादनाचा प्रश्न पूर्णपणे सुटत नाही तोपर्यंत मिहानचा तिढा सुटणार नाही. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सहकार्याने विदर्भातील उद्योजकांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विदर्भात जास्तीत जास्त उद्योग आणण्याचे आमचे प्रयत्न आहे. नव्या औद्योगिक धोरणात अनेक सवलती देण्यात आल्या आहे. अनेक उद्योजकांना धोरणातील काही बाबी माहिती नव्हत्या. त्यांना त्या समजावून देण्यात आल्या. उद्योजकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. महागड्या वीज दरांबद्दल सर्वांनी सांगितले. हे वीज दर कमी करण्याचे प्रयत्न करण्यात येईल.