आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पगारदारांनी वेतनाच्या तुलनेत निम्मे काम केले तरी ती समाजसेवा ठरेल'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा - वर्तमानकाळात घडणार्‍या घटना पाहता माणसाने माणुसकी जोपासण्याची गरज आहे. देश आर्थिक संकटात असताना पगारदारांनी आपल्या वेतनाच्या तुलनेत किमान निम्मे काम केले तरी ती समाजसेवा ठरेल. मात्र, हा सेवाभावच आता लोप पावत चालल्याचे दिसून येत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी केले.

‘आम्ही वध्रेकर’ समितीद्वारे शहरातील शिववैभव सभागृहात पाचवा जीवन गौरव आणि ज्ञानदीप सन्मान समारोह घेण्यात आला. या वेळी डॉ. आमटे बोलत होते. त्यांच्या हस्ते जिल्हय़ातील सामाजिक, सांस्कृतिक आणि शिक्षण क्षेत्रातील सेवाव्रतींचा सत्कार करण्यात आला. मगन संग्रहालयाच्या आत्मप्रभा देवेंद्र, सत्यशोधक चळवळीतील विठ्ठलराव बुचे, कॉ. प्रभा घंगारे, खादी प्रसारक नारायण खल्याळकर, कवयित्री शोभा कदम, क्रीडापटू जानराव लोणकर, सर्वधर्म अभ्यासक हाजी जफर अली, राष्ट्रसंत विचार प्रसारक कृष्णराव दोंदडकर, स्काऊट गाइड मार्गदर्शक आर.आर.जयस्वाल, कादंबरीकार डॉ. इंदू कुकूडकर, कामगार चळवळीतील राजाभाऊ शहागडकर, सवरेदयी लीला सुटे, तांत्रिक सेवेतील नारायण गोस्वामी, संगीततज्ज्ञ वासुदेव गोंधळे, सामाजिक कार्यकर्त्या माधवी साबळे, पशुसेवक मनोहर गोडे, शिक्षण क्षेत्रातील आशा नासरे या ज्येष्ठांचा जीवन गौरव सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, तर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील डॉ.अनिल दुबे, जानकीदेवी बजाज महाविद्यालयातील डॉ. विकास घोडकी, गो.से. वाणिज्य महाविद्यालयातील प्रा.नंदिनी भोंगाडे, नवोदय विद्यालयातील अजित कोठावळे, प्रियदर्शिनी महाविद्यालयातील डॉ. धनंजय सोनटक्के, जिजामाता विद्यालयातील शुभदा देशमुख कोकाटे, न्यू इंग्लिश हायस्कूलमधील विजय जुगनाके, वर्धमनेरी येथील मूकबधीर विद्यालयातील विद्यानंद हाडके, जिल्हा परिषद शाळांमधील संजय ओरके, शाहीन परवीन शेख, किशोर वाघ, सदानंद ठाकरे या शिक्षकांना ज्ञानदीप सन्मानाने गौरवण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष सुनीता इथापे होत्या तर व्यासपीठावर डॉ. मंदाकिनी आमटे, डॉ. अशोक बेलखोडे, जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष समीर देशमुख, समितीचे अध्यक्ष सुरेश राहाटे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरीश इथापे यांनी तर संचालन माधुरी झाडे व आभार सुरेश राहाटे यांनी मानले. या आयोजनात समितीचे कार्याध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, उपाध्यक्ष प्रकाश येंडे, प्रा. मोहन गुजरकर, सचिव प्रा. चंदू पोपटकर, कोषाध्यक्ष महेंद्र भुते, सदस्य मुरलीधर बेलखोडे, डॉ. दीपक पुनसे व सहकार्‍यांनी सहकार्य केले.