आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परतीच्या पावसाचे तांडव, यवतमाळमध्ये वीज कोसळून तीन जण ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ - परतीच्या पावसाचे तांडव सुरू आहे. जिल्हय़ात विविध ठिकाणी वीज कोसळल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला. सर्वत्र झालेल्या पावसाने सर्वांची दाणादाण उडवली. यवतमाळ शहरात अवघ्या दीड तासात विजांच्या कडकडाटासह 75 मिमी. पाऊस कोसळला.

दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली. घाटंजी तालुक्यातील पाढुर्णा येथे शेतात काम करणार्‍या निर्मला जानराव मासुळकर (40), वामन जगन्नाथ जोगी (47) यांचा वीज अंगावर पडून जागीच मृत्यू झाला, तर यवतमाळपासून 25 किलोमीटरवरील तिवसा येथे शेतात काम करणार्‍या प्रमिला राठोड यांचाही वीज पडून मृत्यू झाला. या दोन्ही घटना दुपारी 4 वाजताच्या दरम्यान घडल्या. या पावसामुळे शेतातील सोयाबीन भिजले. यवतमाळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकर्‍यांचे धान्य ओले झाले. यवतमाळ येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील टॉवरवर वीज कोसळली. अवघ्या 50 फूट अंतरावर केबिनमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख बसलेले होते. सुदैवाने कार्यालयातील कर्मचार्‍यांना कुठलीही इजा झाली नाही.