आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MURDER: ग्राहकांसमोरच व्यापा-याची चाकूने भोसकून हत्या, पाहा VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - सीताबर्डीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स बाजारात मोबाइल व्यापारी भरत खटवानी यांची भरदिवसा दुकातून घुसून हत्या करण्यात आली. चेहरा झाकलेल्या हल्लेखोरांनी त्यांना चाकूने भोसकले. तीन हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या भरत खटवानी यांचा मंगळवारी एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
फोटो - या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी बंद पाळला.

या घटनेची बातमी मिळतात इलेक्ट्रॉनिक्स बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये रोष पसरला. सर्वांनी या घटनेच्या विरोधात बंद पुकारला. अद्याप पोलिसांना आरोपींबाबत काहीही धागेदोरे मिळालेले नाहीत.

या घटनेच्या विरोधात व्यावसायिकांनी धरणे देत पोलिस आय़ुक्तांना बोलावण्याचे मागणी केली. आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, उपमहापौर मुन्ना पोकुलवार आणि इतर नागरिक यावेळी जमले होते. सहपोलिस आयुक्त अनुपकुमार सिंह यांनी यावेळी इलेक्ट्राॉनिक्स बाजारात जाऊन लवकरच आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले.

शनिवारी 7 मार्च 2015 रोजी भरत खटवानी सीताबर्डी येथील इलेक्ट्रॉनिक्स बाजारात त्यांच्या हॅलो वर्ल्ड मोबाइल शॉपी मध्ये बसलेले होते. तेव्हा दुकानात काही ग्राहकही होते. त्याचवेळी चेहरा झाकलेले हल्लेखोर दुकानात आले. त्यांनी खटवानी यांच्याकडे हप्ता देण्याची मागणी केली. त्यांनी नकार दिला त्यावेळी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोर फरार झाले. खटवानी यांनी जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सीताबर्डी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी सीसीटिव्ही फुटेजही समोर आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भरत यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून हप्ता देण्यासाठी दबाव आणला जात होता. त्यादिशेनेही पोलिस तपास करत आहेत. तसेच या हत्येमागे तेलीपुरा आणि शनिवारी परिसरातील गुंडांचा हात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, घटनेचे PHOTO आणि अखेरच्या स्लाइडवर पाहा VIDEO