आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अख्ख्या शहरातील वीज गुल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अनेक वर्षांपासून भारनियमन मुक्त असलेल्या अमरावतीवरील वीजसंकटाचे काळे ढग बुधवारी (दि. २०) अधिक गडद झाले, ज्या वेळी सुमारे चार तास अख्ख्या शहराची वीज पूर्णपणे गुल झाली होती. आपत्कालीन भारनियमनामुळे शहरातील निम्म्यावर भागांत वीजपुरवठा दिवसभर ठप्प होता, तर उर्वरित भागांमध्ये दर १० ते १५ मिनिटाला विजेचा लपंडाव सुरू होता. या भारनियमनामुळे जिथे सर्वसामान्य अमरावतीकरांना बुधवारी चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला, तिथे या मुद्द्याचे भांडवल करीत विरोधी पक्षातील स्थानिक नेत्यांनी पुन्हा एकदा राज्यातील सत्ताधारी आघाडीचा राजकीय बल्ब फ्यूज करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. भारनियमनाचा फटका नागरिकांसह शहरातील बाजारपेठ व उद्योगांनाही बसला आहे.

येथे सुरू होता लपंडाव
श्यामनगर, तहसील कार्यालय, जवाहर गेट, नमुना, अंबापेठ, रुक्मिणीनगर, शंकरनगर, विद्यापीठ परिसर, कॅम्प, गाडगेनगर.
आकस्मिक भारनियमन
शहरात बुधवारी आकस्मिक भारनियमन करावे लागले. त्यामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा काही तासांकरिता खंडित झाला होता, असे महावितरणकडून सांगण्यात आले.
कुठे, किती वेळ नव्हती वीज
स. १० ते ५ : अर्जुननगर, गाडगेनगर, राठी नगर, पंचवटी, विलासनगर.
दु. १ ते ४ : पार्वतीनगर, गडगडेश्वर, छाया कॉलनी, आदिवासी वसतिगृह, नवाथे, दस्तुर नगर चौक.
दु. २ ते ४ : गोसावीनगर, न्यू प्रभात कॉलनी, नवाथे.
दु. २ ते ५ : कलोतीनगर, यशोदानगर, दस्तुरनगर, बडनेरा जुनी वस्ती.
दु. ३ ते ६ : श्याम चौक, बापट चौक, राजकमल, राजापेठ, साईनगर, प्रभात कॉलनी,
सा. ५ ते ६ : रवि नगर, न्यू छांगाणीनगर, पार्वतीनगर, गडगडेश्वर, छाया कॉलनी, आदिवासी वसतिगृह, नवाथे.