आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोणार सरोवराला जागतिक स्थळाचा दर्जा मिळणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - जगप्रसिद्ध लोणार सरोवरास जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य शासनाकडून हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती बुधवारी राज्य शासनाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात देण्यात आली. लोणार सरोवरातील प्रदूषणासंदर्भात स्थानिक सामाजिक कार्यकर्त्या कीर्ती निपाणकर आणि बुगदाणे यांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान शासनाच्या वतीने ही माहिती देण्यात आली.
त्या दिशेने शासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे सरकारी वकील भारती डांगरे यांनी न्यायालयात सांगितले. राज्य सरकारने लोणारच्या प्रदूषणमुक्तीसाठी निधी उपलब्ध केला आहे. त्यानुसार राज्य व जिल्हास्तरीय समितीच्या निगराणीखाली काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात शासनाने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. लोणार गावातील सांडपाणी सरोवरात जात असल्याने या जगप्रसिद्ध सरोवरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. त्यामुळे या सरोवराचे संवर्धन व्हावे, या मागणीसाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे.