आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यावर आली \'परिक्षेची\' वेळ, सोबत आणले दोन पेन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- एखाद्या राज्याचा कॅबिनेट मंत्री सर्वसाधारण विद्यार्थ्यांप्रमाणे हातात पेन घेऊन परिक्षा केंद्रावर जाऊन चक्क पेपर सोडवतो, असे काही ऐकिवात नाही. पण महाराष्ट्रात हे घडले आहे. समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले यांनी चक्क दोन पेन हातात घेऊन परिक्षा केंद्रावर जाऊन पेपर सोडवला. आता यात त्यांना किती मार्क मिळाले हे गुपित असले तरी त्यांच्या या कृतीची प्रचंड उलटसुलट चर्चा सुरु आहे.
नागपुरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठात ‘आंबेडकरांचे विचार’ या विषयावर आज (बुधवार) पेपर घेण्यात आला. त्यासाठी चक्क समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते. पण परिक्षा केंद्रावर ते मंत्र्याच्या नव्हे तर विद्यार्थ्याच्या भूमिकेत दिसून आले.
विद्यापिठाच्या प्रांगणात आल्यावर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गराडा घातला. तेव्हा त्यांनी पेपरला उशीर होईल, अशी सबब देऊन प्रतिनिधींना चुकविण्याचा प्रयत्न केला.
बडोले परिक्षा केंद्रावर आले तेव्हा त्यांच्या गाडी मागे मंत्र्याच्या गाडीमागे असतो तसा ताफाही नव्हता. साध्या विद्यार्थ्याप्रमाणे ते आले होते.
यावेळी बडोले म्हणाले, की मंत्रीपद मिळण्यापूर्वीच ही परिक्षा देण्याची माझी इच्छा होती. त्यासाठी कसुन अभ्यासही सुरु होता. पण मंत्रिपद मिळाल्याने परिक्षा देता आली नाही. आता ही इच्छा मला पूर्ण करायची आहे. त्यामुळे काल रात्री जागून अभ्यास केला. आणि आज परिक्षेला आलोय.
‘आंबेडकरांचे विचार’ या अभ्यासक्रमाचे चार पेपर बडोले देणार आहेत. यापूर्वी त्यांनी इतिहास या विषयात एमए केले आहे. गोंदिया अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे ते प्रतिनिधीत्व करतात.