१ मे हा महाराष्ट्र दिन. पण, विदर्भवाद्यांनी तो विदर्भ दिन म्हणून साजरा केला. आणि वेगळ्या विदर्भासाठी वेगवेगळी आंदोलने करत सरकारपर्यंत आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळी आंदोलने झाल्याने ताकद िवखुरली गेली. त्यामुळे एकच मोठा आवाज होण्याऐवजी वेगवेगळे आवाज निघाले. त्यातून आंदोलनाची परिणामकारकता निघून गेल्याचे जाणवले.
विदर्भ कनेक्ट संघटनेने बजाजनगर येथील ‘विष्णूजी की रसोई’मध्ये िवदर्भाचा झेंडा फडकवला. या उपक्रमाला ‘जनमंच’ने समर्थन दिले होते. अॅड. अनिल किल्लोर, शेतकरी नेते चंद्रकांत वानखेडे, िवदर्भ कनेक्टचे अॅड. मुकेश समर्थ आदी या वेळी उपस्थित होते. वेगवेगळी आंदोलने केल्यामुळे ताकद िवखुरली जाते. त्यामुळे आम्ही वेगळे आंदोलन करत नाही. पुतळे वगैरे न जाळता सकारात्मक आंदोलन करणाऱ्यांसोबत राहताे, असे अॅड. किल्लोर यांनी सांगितले.
िवदर्भ राज्य आंदोलन समितीने व्हेरायटी चौकात आंदोलन केले. समिती पंतप्रधान, मुख्यमंत्री व नितीन गडकरी यांचे प्रतीकात्मक पुतळे जाळणार होती. मात्र, पोलिसांनी पुतळे जाळू दिले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निदर्शने करून सरकारचा निषेध केला. संघटनेचे राम नेवले, प्रबीरकुमार चक्रवर्ती, अॅड. नंदा पराते यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
नवराज्य निर्माण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष दीपक निलावार यांनी इतवारीतील िवदर्भ चंडिकेजवळ कार्यक्रम घेतला. हा कार्यक्रम म्हणजे सरकारला साॅफ्ट रिमाइंडर आहे. सरकार
आपले असल्याने थोडा वेळ देण्याची भूमिका आहे. सरकार दिलेल्या वचनाला जागले नाही तर आंदोलन तीव्र करू, असा इशारा दीपक निलावार यांनी दिला. जांबुवंतराव धोटे यांनीही ‘फाॅरवर्ड ब्लाॅक’तर्फे आंदोलन केले, तर भारिप बहुजन महासंघातर्फे रिझर्व्ह बँकेजवळील संविधान चौकात निदर्शने करण्यात आली.
तृतीयपंथीयांचेही आंदोलन : वेगळ्या िवदर्भासाठी नागपुरातील तृतीयपंथीयांनीही व्हेरायटी चौकात आंदोलन केले. भारतीय किन्नर सर्व समाज सेवा समितीचे अध्यक्ष उत्तमबाबा यांच्या नेतृत्वात किन्नरांनी िवदर्भाच्या घोषणा देत सरकारचा निषेध केला. सध्या नागपूरसह िवदर्भात उष्णतेची लाट आहे. पारा ४४ अंशांवर गेल्याने ऊन चांगलेच तापले आहे. त्याचा फटकाही िवदर्भवाद्यांच्या आंदोलनाला बसल्याचे चित्र होते.
"आप'ही मैदानात : आम आदमी पार्टीतर्फे १ मे महाराष्ट्रदिनी व्हेरायटी चौक येथे दुपारी धरणे आंदोलन करण्यात आले. लोकसभा व विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला निवडून दिल्यास वेगळा विदर्भ देण्याचे आश्वासन िदल्याने जनतेने भाजपला सत्तेवर आणले. परंतु, सत्ताप्राप्तीनंतर भाषा बदलली. आम आदमी पार्टी याचा निषेध करते, असे आपचे देवेंद्र वानखेडे यांनी सांगितले.
फोटो - विदर्भ राज्य आंदोलन समिती यांच्या वतीने वेगळया विदर्भाच्या मागणी करीता नागपुरातील व्हेरायटी चौकात आंदोलन केले . यावेळी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात घोषणबाजी करण्यात आली . या आंदोलनात पुरुष , महिला , तरुण , वयोवृध्द सहभागी झाले होते या आदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.