आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • The Maharashtra Government Has Given A “no Objection Certificate” For Only Organic Farming

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जैविक पिकांना मान्यता देण्याचा घाट राज्य सरकारने घालू नये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - महाराष्ट्र सरकारने वांगी, मका, तांदूळ, कापूस आणि काबुली चणे या जैविक पिकांच्या बंदिस्त चाचणीला परवानगी दिली. यावरून मोठे वादळ उठले आहे. संघ परिवारातील भारतीय किसान संघ व स्वदेशी जागरण मंच या संघटनांनीही याबाबत मौन बाळगल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने संपर्क साधला असता ‘चाचणीला आमचा विरोध नसून बियाण्यांच्या व्यावसायिक वापराला आहे,’ असे स्वदेशी जागरण मंचाचे अखिल भारतीय विचार मंडलप्रमुख अजय पक्की यांनी स्पष्ट केले.

नवे विज्ञान-तंत्रज्ञान वा संशोधनाचे चांगले, वाईट निष्कर्ष चाचणीनंतरच समजतात. त्यामुळे चाचणीला आमचा विरोध नाहीच. पण जैविक बियाण्यांच्या व्यावसायिक वापराला आमचा विरोध असून आम्ही आमच्या भूमिकेवर कायम आहोत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहोत. चाचणीपुरते ठीक आहे, पण उगाच जीएम पिकांना मान्यता देण्याचा घाट घालू नका, असा इशारा पक्की यांनी दिला. तरीही मान्यता देण्याचा प्रयत्न झाल्यास प्रसंगी आंदोलने करू, असे पत्कींनी स्पष्ट केले.

आंधळा विरोध नको
नवनवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाचे चांगले-वाईट परिणाम हे चाचणीअंतीच समजतात. त्यामुळे जीएम पिकांच्या चाचणीला आंधळेपणाने विरोध करता कामा नये. चाचणीआधीच विरोध शहाणपणाचे लक्षण नाही. चाचणीचे निष्कर्षही डोळसपणे तपासले पाहिजेत. - चंद्रकांत वानखेडे, शेतकरी नेते