आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Navnirman Sena News In Marathi, Divya Marathi, Nitin Gadkari

नागपुरात मनसेचा गडकरींशी ‘मैत्रीधर्म’, उमेदवारी न देण्‍याची योजना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - काँग्रेसविरोधी मतांचे विभाजन टाळण्यासाठी भाजप नेते नितीन गडकरी यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंकडे केलेली शिष्टाई अपयशी ठरली असली तरी राज यांच्याशी असलेल्या मैत्रीचे फळ त्यांना नागपुरात मिळणार असल्याचे बोलले जाते. नागपूर मतदारसंघात उमेदवार उभा न करण्याचा निर्णय मनसेकडून घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे.


राज्यात काँग्रेसविरोधी मतांचे विभाजन टाळावे, यासाठी गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्या भेटीचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले. शिवसेनेने त्यावर आक्षेप घेत गडकरी यांच्या कार्यशैलीचा समाचार घेतला. शिवसेनेच्या विरोधामुळे गडकरी यांची शिष्टाई अपयशी ठरू शकली नाही. मात्र, नागपुरात गडकरी यांच्या विरोधात मनसे उमेदवार उभा करणार नसल्याची चर्चा स्थानिक स्तरावर सुरू झाली आहे. मनसेच्या काही नेत्यांनी त्याला दुजोराही दिला आहे. मनसेची उमेदवार यादी रविवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र नागपुरात उमेदवार दिला जाणार नाही.

समावेश राहील. त्याचवेळी नागपुरात मात्र उमेदवार दिला जाणार नाही, असे या नेत्यांनी सांगितले. नागपुरात मनसेचा फारसा प्रभाव नसला तरी काही हजार मते घेण्याची निश्चितच क्षमता असल्याचे मानले जाते. त्यामुळे मनसेने उमेदवार उभा न केल्यास काँग्रेस विरोधी मतांचा फायदा गडकरी यांना होऊ शकतो, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. गडकरी यांनीही त्याच दृष्टीने राज ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.