आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra State Transport Company In Loss Says Jeevan Gare

सवलतींमुळेच एसटी तोट्यात, राज्य सरकारने 600 कोटी दिल्याने झाले कर्मचार्‍यांचे पगार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - एसटीतून प्रवास करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या 23 सवलती दिल्यामुळे दिवसेंदिवस महामंडळाचा कारभार तोट्यात असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी सांगितले. एसटीचा राज्यभरातील कारभार बघण्यासाठी गोरे फिरत आहेत. 24 जिल्ह्यांतील एसटीची परिस्थिती बघून झाल्यानंतर ते बुधवारी अमरावती विभागातील तक्रारी, समस्या ऐकण्याकरिता अमरावती येथे आले असता त्यांनी ही माहिती दिली. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, संजीवनी र्शुंगारे, विजय भैसे आणि सुरेखा ठाकरे होते.त्यातच डीझेलची दरवाढ झाल्याने 487 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सोसावा लागला. यावर्षी राज्य सरकारने 600 कोटी रुपये महामंडळाला दिल्याने कर्मचार्‍यांचे पगार करणे शक्य झाले.विविध प्रवास सवलत योजनेतील सुमारे दोन हजार कोटींची थकबाकी राज्य सरकारने अद्यापही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला दिली नाही. परिणामी तोटा वाढत असल्याचे गोरे म्हणाले. 2011 पर्यंत 59 कोटी रुपये नफा महामंडळाला झाला होता. मात्र, कर्मचार्‍यांच्या वेतन करारापोटी आर्थिक बोजा वाढल्याने 428 कोटी रुपयांचा तोटा असल्याचे गोरे म्हणाले.

महाराष्ट्र दुसरा

देशभरात 28 राज्यांमध्ये प्रवाशांकरिता सेवा, सुविधा आणि गतिमान वाहतुकीच्या विषयात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. कर्नाटक राज्य हे पहिल्या क्रमांकावर आहे. राज्य सरकारमार्फत 23 प्रकारच्या सवलती देण्यात येतात.

प्रत्येक स्थानकात विशाखा समिती
कामाच्या ठिकाणी महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक बसस्थानकात समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीला ‘विशाखा समिती’ असे संबोधण्यात येते. अमरावती येथे स्मिता सुतवणे या समितीच्या अध्यक्ष आहेत. चार महिला आणि तीन पुरुष सदस्य आहेत.

खरेदी केल्या तीन हजार नव्या गाड्या
गेल्या वर्षभरात महामंडळाने तीन हजार नव्या एसटी बसची खरेदी केली. या पैकी मानव निर्देशांकातून 600 बसेस चालवण्यात येतात. पश्चिम विदर्भात 110 बस सुरू आहेत. जीवनराव गोरे, अध्यक्ष, महामंडळ

महिला सुरक्षा पथक 24 तास तैनात करा
बसस्थानक परिसरात महिला अत्याचाराचे प्रमाण अधिक आहे. अशा सार्वजनिक ठिकाणी महिलांकरिता पोलिसांचे विशेष सुरक्षा पथक 24 तास तैनात असावे. रश्मी नावंदर, माजी नगरसेविका