आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra State Women Commission Member Asha Mirje Latest News

बलात्कारासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आशा मिरगेंच्या पाठीशी सुप्रिया सुळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई /नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या कन्या आणि पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला आयोगाच्या सदस्य डॉ. आशा मिरगे यांचा बचाव केला आहे. लैंगिक शोषणासाठी महिलांचे कपडे आणि निमंत्रक हावभाव जबाबदार असल्याचे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी डॉ. आशा मिरगे यांनी केले होते. त्याचा बचाव आज (बुधवार) खासदार सुळे यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, 'मिरगे यांनी जी मते मांडली ती कोणत्याही घरातील वयोवृद्ध मंडळी तरुणांना शिकवणीच्या स्वरुपात रोजच सांगत असतात. हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. मिरगे यांनी महिलांसाठी केलेले काम फार मोठे आहे. त्यांनी अनेक गँगरेप पीडित महिलांचे पुनर्वसन केलेले आहे. त्यांनी मंगळावरी केलेल्या वक्यव्याबद्दल माफी मागितली असून आता हे प्रकरण संपलेले आहे.'
महिलांवरील वाढत्या अत्याचाराला महिलादेखील काही अंशी जबाबदार आहेत. महिला, मुलींनी आपण काय करतोय, कुठे जातोय याबद्दल सारासार विचार करायला हवा. केशभूषा, वेशभूषा, देहबोली निमंत्रक स्वरूपाची तर नाही ना, याचेही भान राखावे, अशा शब्दांत महिला आयोगाच्या सदस्य डॉ. आशा मिरगे यांनी मंगळवारी अजब तर्कट मांडले. यावरून सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्या त्यानंतर त्यांनी आज (बुधवार) माफी मागितली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आशा मिरगेंच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करुन त्यांचे काम पाहावे असे म्हणत त्यांची पाठराखण केली आहे.
मिरगे म्हणाल्या, 'माझ्या भावना या प्रामाणिक होत्या मात्र, त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी मोठ्या मनाने माफी मागते. ते पक्षाचे नसुन माझे वैयक्तिक मत होते.'
डॉ. आशा मिरगे यांच्या वक्तव्यावर टीका
डॉ. आशा मिरगे यांच्या वादग्रस्त वक्तव्यवार चहुबाजूंनी टीका होत आहे. शिवेसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी डॉ. मिरगे यांनी स्त्रियांचा अपमान केला असून कायद्याचे धिंडवडे काढले, असल्याचे म्हटले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष ममता शर्मा यांनी देखील डॉ. मिरगे यांच्या वक्तव्यचा निषेध केला आहे. भाजपनेही त्यांचे वक्तव्य चूकीचे असल्याचे म्हटले आहे. भाजपने डॉ. मिरगे यांच्या वक्तव्याची तुलना दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याशी केली आहे. शीला दीक्षित यांनीही महिलांनी रात्री घराबाहेर जाऊ नये असे म्हटले होते.
पुढील स्लाइडमध्ये, जाणून घ्या शर्मिला ठाकरे काय म्हणातात...