नागपूर - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे तीन दविस उरले असतानाही दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपदाबाबत मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. विराेधकांना महत्त्वच द्यायचे नाही, अशी भूमिका फडणवीस सरकारने घेतल्यामुळे मागील दोन आठवडे या पदांवर नविड करण्याबाबतचा मुद्दा जाणीवपूर्वक दुर्लक्षित झाला. आता साेमवारपासून अधिवेशनाचा ितसरा आठवडा सुरू होत असून तीनच दविस कामकाज चालणार आहे.
दरम्यान, या मुद्द्यावर राष्ट्रवादी आक्रमक भूमिका घेणार असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. तर पाच आमदार निलंबित झाल्यामुळे आधीच गर्भगळीत झालेल्या काँग्रेसने विधानसभेत आमचाच विरोधी पक्षनेता होईल, असा दावा उसने अवसान आणून केला आहे. मात्र या दोन्ही विराेधकांच्या भांडणात सत्ताधारी विरोधी पक्षनेत्यांशिवाय अधिवेशन चालवून दाखवल्याचे सांगत पाठ थाेपटून घेतील, यात शंकाच नाही. विरोधी पक्षनेता घोषित करण्याचे अधिकार परिषदेत सभापती आणि विधानसभेत अध्यक्षांना आहेत. परिषदेत राष्ट्रवादीने सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. प्रस्तावाला १४ दिवसांची मुदत असते. ती शुक्रवारी संपत आहे. मात्र, बुधवारीच अधिवेशनाचे सूप वाजत असल्याने आता हा प्रस्ताव अर्थसंकल्पीय अधिवेशनात आणावा लागेल. म्हणजेच या अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेता घोषित करण्याचे कोणतेही दडपण सभापतींवर नाही, याकडे सूत्रांनी लक्ष वेधले.
काँग्रेसगारठली, निलंबनाचीच चिंता
हिवाळीअधिवेशनात काँग्रेस गारठल्याचे िदसून आले. विधानसभेत ितसऱ्या क्रमांकाचा पक्ष असूनही विरोधी पक्षनेता नविडीवरून काँग्रेस आक्रमक झालेली नाही. कारण या पक्षाचे पाच आमदार निलंबित करण्यात आले असून त्यांचे निलंबन मागे घेण्याची या अधिवेशनात तरी शक्यता दिसत नाही. त्यातच राष्ट्रवादीने मित्रपक्षांच्या जाेरावर या पदावर दावा केला असल्यामुळे काँग्रेसची अधिकच कोंडी झाली आहे. पक्षाचे गटनेेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, साेमवारी सकाळी १० वाजता काँग्रेस आमदारांची बैठक होणार आहे. मात्र, सभागृहात आक्रमक होण्यात काही हशील नाही. कारण हा संवैधानिक प्रश्न आहे. मात्र, आमच्यासमाेर आमदारांचे िनलंबन मागे कसे घ्यायचे हा प्रश्न आहे, असे विखे पाटील म्हणाले. दरम्यान, काँग्रेस आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून त्यांनी याबाबत सकारात्मक संकेत दिल्याचेही ते म्हणाले.
काय आहेत अडचणी?
विधानसभा : काँग्रेसचे ४२, तर राष्ट्रवादीचे ४१ सदस्य आहेत. मात्र, काँग्रेसचे पाच आमदार निलंबित असल्याने त्यांचे संख्याबळ ३७ वर आले आहे, तर मित्रपक्ष अपक्षांच्या साथीने राष्ट्रवादीकडे ४६ सदस्य असून त्यांनी विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. त्यांना हे पद मिळवून देण्यात विधानसभा अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.
विधानपरिषद : राष्ट्रवादीचे२८, तर काँग्रेसचे २१ सदस्य आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादीचे निर्वविाद वर्चस्व आहे. मात्र, विधानसभेत राष्ट्रवादीने कोंडी केल्यामुळे काँग्रेसने परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. त्यामुळे या दोघांच्या भांडणात सभापतींनी हा मुद्दा लटकवत ठेवला आहे.
नेता आमचाच होणार -माणिकराव ठाकरे
काँग्रेसप्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मात्र विधानसभेत विरोधी पक्षनेता काँग्रेसचाच होईल, असा पाेकळ दावा केला आहे. अधिवेशन विदर्भात सुरू आहे. निलंबित आमदारही विदर्भातील आहेत. त्यामुळे शेवटच्या िदवशी का होईना त्यांनी कामकाजात सहभागी व्हावे, यासाठी आमचे प्रयत्न राहतील, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
भाजपचे डावपेच
‘काँग्रेसमुक्तभारता’चे ध्येय ठेवलेल्या भाजपने संसदेतही काँग्रेसला अजूनही विरोधी पक्षनेतेपद मिळू दिलेले नाही. त्यानुसारच फडणवीस सरकारनेही राज्यात काँग्रेसला हे पद मिळू देण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठीच राष्ट्रवादीला पाठबळ देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. विधानसभा नविडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीने भाजपच्या अल्पमतातील सरकारला मागता पाठिंबा दिला होता. या उपकाराची परतफेडही करण्याची भाजपची भूमिका असल्याचे दिसते.
अंतिम आठवडा प्रस्ताव, केळकर अहवाल गाजणार
हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात अंतिम आठवडा प्रस्ताव केळकर समितीचा अहवाल हे महत्त्वाचे विषय गाजण्याची चिन्हे आहेत. अंतिम आठवडा प्रस्ताव विरोधकांकडून मांडला जातो. राज्यातील गंभीर समस्या वा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव एक महत्त्वाचे आयुध आहे. अर्थात अंतिम आठवडा प्रस्तावात फारसे विषय नसल्याने केळकर समितीच्या अहवालावर विराेधकांची मदार असेल. फडणवीस सरकार केळकर समितीचा अहवाल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यावर चर्चा होऊ शकणार नाही आणि याच मुद्द्यावर विराेधक शेवटच्या दिवशी गदाराेळातच अधिवेशनाचे सूप वाजवतील, अशी शक्यता आहे.