आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘महसूल’ने टाकला बहिष्कार; बारा मुद्द्यांवर कर्मचार्‍यांचे रजा आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - प्रशासकीय बदल्यांतील गैरसोयी तसेच विनंती व आपसी बदल्यांबाबतची दिरंगाई या मागण्यांसह बारा मुद्द्यांवर महसूल कर्मचारी संघटनेने शुक्रवारी (दि. 27) अर्ध्या दिवसाचे रजा आंदोलन केले. दुपारनंतर कामकाजावर बहिष्कार घालून कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या दालनासमोर निदर्शने केली.

अव्वल कारकुनांना (एके) मंडळ अधिकारी संवर्गात बदली देताना प्रशासनाने जाणीवपूर्वक अन्याय केला असून, पुरवठा निरीक्षक व करमणूक कर निरीक्षकांच्या बदल्यातही घोळ झाल्याचा आरोप संघटनेने केला. कालबद्ध पदोन्नतीत दुरुस्ती करणे, मागील दिनांकाची प्रकरणे निकाली काढणे, एक जानेवारी 2014 या अर्हता दिनांकानुसार ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे, वाहनचालक व शिपायांना गणवेश पुरवणे, तालुकास्तरावर प्रसाधनगृह व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आदी मागण्यासुद्धा या वेळी आंदोलनकर्त्यांनी केल्या.
संघटनेचे कार्याध्यक्ष के. सी. रघुवंशी, सचिव नामदेव गडलिंग, सुशील पवार, पप्पू मिश्रा, ए. डी. नागरे, सी. टी. राऊत, पी. बी. गाडबैल, एस. पी. कन्नमवार, एस. आय. शेख, डी. एन. गजभिये, आय. के. गिरी, एस. डी. नवाडे, व्ही. एम. नाकाडे, जे. एस. मंडपे, डब्ल्यू. वाय. रोंघे, सुशील मेटांगे, एन. आर. मेहरे, एस. के. वाडीभस्मे, जे. पी. बिजवे आदी कर्मचारी सहभागी झाले होते.

हे आंदोलनात नाहीत
काही कर्मचार्‍यांनी आंदोलनात सहभाग न घेता प्रशासकीय, आपसी व विनंती बदल्यांमध्ये प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे. यामध्ये भोजराज वाघमारे, प्रशांत देशमुख, आशीष ढवळे, श्याम देशमुख, अंबादास काकडे, दिनेश गवई, ब्रजेश वस्तानी, दिलीप देवळे, अजय बनारसे, विनायक लंगडे, गोकूल निशाद, शरद लोणारे, आशीष अंबाडकर, प्रवीण वैद्य, संदीप टांक, राजेश चौधरी, किशोर चांदूरकर आदींचा समावेश आहे.

30 पासून ‘लेखणी बंद’
25 जून रोजी काळ्या फिती लावून काम करतानाच या कर्मचार्‍यांनी मुख्य द्वारावर निदर्शनेही केली. आजच्या रजा आंदोलनानंतर 30 जूनपासून लेखणी बंद आंदोलन व पाच जुलैपासून बेमुदत संप सुरू करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

पदाधिकार्‍यांशी चर्चा
तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश बगळे यांनी दुपारपूर्वी महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. दुपारनंतर ते या विषयावर जिल्हाधिकार्‍यांशी बोलणार होते.
कामुने करताहेत चौकशी
कर्मचार्‍यांच्या तक्रारींबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर कामुने यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. कर्मचार्‍यांनी लावलेले आरोप, प्रत्यक्ष स्थिती अशा दोन्ही बाबींचा विचार करून ते अहवाल सादर करतील.
राहुल रंजन महिवाल, जिल्हाधिकारी.
फोटो - महसूल कर्मचार्‍यांच्या ‘बंद’मुळे कर्मचारीरहित झालेले जिल्हा कचेरीतील एक दालन.