आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahauti Set Distubation Issue Latest News Marathi

महायुतीत घटक पक्षांचा विचार करूनच जागावाटप, भाजप प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - महायुतीतील घटक पक्षांचा समग्र विचार करूनच विधानसभा निवडणुकीचे जागावाटप होईल, असे स्पष्ट करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी जागावाटपाचा जुना फॉर्म्युला बदलण्याचे स्पष्ट संकेत दिले.
विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या वतीने महापौर प्रा. अनिल सोले यांनी गुरुवारी विभागीय उपायुक्तांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी बोलताना फडणवीस म्हणाले की, सध्या महायुतीत सहा घटक पक्ष आहेत. जागावाटपाच्या वेळी सर्वच पक्षांचा विचार करून निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे जागावाटपासाठी जुना फॉर्म्युला लागू होणार नाही, असे स्पष्ट संकेत त्यांनी या वेळी दिले.
राष्ट्रवादीचा मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे ‘नव्या बाटलीत जुनी दारू’ असा प्रकार आहे. त्याचा आघाडी सरकारला कुठलाही फायदा होणार नाही. आघाडी सरकारचे जनतेशी नाते पूर्णपणे तुटलेले आहे. त्यामुळे त्यांचा पराभव अटळ आहे, असे फडणवीस म्हणाले. उस्मानाबाद येथील पोलिस अत्याचाराच्या प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करताना फडणवीस म्हणाले की, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी छोट्या अधिकार्‍यांवर कारवाई केली आहे. त्यापेक्षा या घटनेस जबाबदार मोठय़ा अधिकार्‍यांवर कारवाई होणे अपेक्षित होते. गृहमंत्री चुकीच्या अधिकार्‍यांना पाठीशी घालत असून, विधिमंडळ अधिवेशनात हा मुद्दा उचलून धरणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला.