आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूवैज्ञानिक सर्वेक्षण : मातीची पाणी शोषण क्षमता संपल्यानेच बुडाले माळीण गाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - पुणे जिल्ह्यातील माळीण हे गाव बुधवारी डोंगरकडा कोसळल्याने जमिनीखाली गाडले गेले. 54 पैकी फक्त सहा घरे व शाळा वाचली. ही दुर्घटना मातीची पाणी शोषून घेण्याची क्षमता संपल्याने झाली, अशी माहिती नागपूर येथील भूवैज्ञानिक सर्वेक्षणचे उपमहानिदेशक डॉ. असीमकुमार साहा यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. नागपूर भूवैज्ञानिक सर्वेक्षणच्या सुमारे दहा-बारा जणांचा समावेश असलेल्या चमूने शनिवारी माळीण येथे भेट देऊन पाहणी केली.
माळीण येथील दुर्घटना मानव निर्मित की निसर्गाचा प्रकोप, यावर बराच खल सुरू आहे. या भागाचे आमदार तसेच विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी तेथे पडकई योजना राबवण्यात आली नव्हती, असे स्पष्ट केले. घटना मानवनिर्मित आहे की निसर्गनिर्मित हे ठरवण्यासाठी तज्ज्ञांनी अभ्यास करून सांगावे, असेही वळसे-पाटलांनी म्हटले होते. त्यानुसार नागपूरच्या चमूने माळीण येथे जाऊन अभ्यास केला.

डोंगरउतारावर शेती करण्यासाठी सपाटीकरण केल्यामुळे आणि त्यासाठी झाडे तोडल्यामुळे ही दुर्घटना घडली, एवढे एकच कारण यामागे नाही. कारण डोंगरकडा टेकडीच्या शिखरापासून थोड्या अंतरावरून कोसळला. गाव उत्तर-दक्षिण असे वसले आहे. यात गावातील मधली वस्ती पूर्णपणे गाडली गेली. उत्तरेकडील तुरळक घरे वाचली तर दक्षिणेकडील घरे शाबूत राहिली, असे साहा यांनी सांगितले.

यामुळे घडली दुर्घटना
डोंगर उतारावर तुकड्यातुकड्याने शेती करण्यात येत होती. शेतकर्‍यांनी शेतीला दगडांचे कुंपण केले होते. मातीची पाणी शोषून घेण्याची क्षमता असते. सलग तीन दिवस चांगला पाऊस झाल्यामुळे मोठ्या दगडांवरील माती घसरून उताराच्या दिशेने वाहत आली. शेताला घातलेल्या दगडी बांधाचे मोठाले दगडही मातीसोबत घरंगळत गावावर कोसळले. यात कच्ची घरे गाडली गेली, असे साहा यांनी स्पष्ट केले.