आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manish Pethe Murder Case Police Vehicle Seal At Amaravati

अमरावतीत पेठे मृत्यूप्रकरणी पोलिसांचे वाहन ‘सील’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मनीष पेठे मृत्यू प्रकरणाचा तपास करणार्‍या केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (सीबीआय) पथकाने गाडगेनगर पोलिसांचे वाहन मंगळवारी जप्त केले. गाडगेनगर पोलिसांनी जुगार खेळणार्‍यांना पकडण्यासाठी काही महिन्यांपूर्वी एका अपार्टमेंटमध्ये छापा टाकला होता. या दरम्यान मनीष पेठे यांचा इमारतीवरून संशयास्पदरीत्या पडून मृत्यू झाला होता.
पेठे यांच्या नातेवाइकांनी तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आली आहे. या प्रकरणी सीबीआयने यापूर्वी पेठे कुटुंबीयांकडून माहिती घेतली होती. त्यानंतर ज्या ठिकाणी पेठे यांचा मृत्यू झाला, त्या अपार्टमेंटचीही पाहणी पथकाने केली होती. मंगळवारी सीबीआयने अक्षय नाल्हे यांचा जबाब नोंदवला. ज्या फ्लॅटमध्ये पोलिसांनी छापा टाकला, तेथे नाल्हे हे भाड्याने राहत होते. दरम्यान, ही कारवाई गाडगेनगर पोलिसांनी केल्याने त्यांचे वाहन सीबीआयने ‘सील’ केले काय, याची माहिती घेण्यासाठी गाडगेनगरच्या पोलिस निरीक्षकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.