आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधी परिवार काँग्रेसला एकत्र ठेवून मजबुती देणारा गोंद! मणिशंकर अय्यर उवाच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - गांधी परिवार हा काँग्रेसला मजबुती देणारा गोंद (बॉँडिंग अँढेसिव्ह)आहे. हा परिवार होता म्हणून काँग्रेसला 44 जागा तरी मिळाल्या, अन्यथा चार जागाही मिळाल्या नसत्या, या शब्दांत माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी नागपुरात नेतृत्वावर स्तुतिसुमने उधळली.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रामटेक येथे आयोजित पंचायत राज मेळाव्यासाठी अय्यर नागपुरात आले होते. देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. गांधी परिवारावर काँग्रेसमधूनच टीका सुरू झाली आहे. त्याबद्दल बोलताना अय्यर म्हणाले की, काँग्रेसमध्ये कुठल्याही नेतृत्वबदलाची गरज नाही. स्मृती इराणी प्रकरणावर बोलण्यास नकार देताना 370 कलमावर देशात चर्चा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करून वाद्ग्रस्त विषयामुळे विभाजन होऊ नये, अशी काँग्रेसची इच्छा असल्याचे अय्यर म्हणाले.
चहावाला प्रकरणी घुमजाव
अय्यर यांनी मोदींवर चहावाला म्हणून प्रथम टीका केली होती. त्यावर विचारलेल्या प्रश्नावर अय्यर संतप्त झाले. प्रसार माध्यमांनीच याप्रकरणी अर्थाचा अनर्थ केल्याचा दावा करताना मोदी यांनीच स्वत:ची चहावाला म्हणून ओळख करून दिली होती, असे अय्यर म्हणाले. नीच राजनीती शब्दाचा त्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी वापर करून घेतला, अशी टीकाही त्यांनी केली.

पुढील स्लाइडमध्ये, पंतप्रधानपदासाठी मोदी अयोग्यच