आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Many Professors Having Fake P.hd Degree In Nagpur

सीएमजे विद्यापीठ : राज्यभरात बनावट पी.एचडीधारकांचा सुळसुळाट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपुर/चंद्रपुर/औरंगाबाद - मेघालयातील सीएमजे या विद्यापीठातून महाराष्‍ट्रातील अनेक विद्यापीठातील प्राध्‍यापकांनी पैसे मोजून पी. एचडी मिळवल्याची माह‍िती उघडकीस आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे प्राध्‍यापक हे नागपूर विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, विविध विद्याशाखेत कार्यरत असल्याची कळते. या प्रकरणावर बोलताना कुलगुरू डॉ.विलास सपकाळ यांनी सांगितले की, बनावट पी. एचडी असणा-या प्राध्‍यापकांवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.

राज्यातील सोलापूर, नागपूर, औरंगाबाद, जळगाव या विद्यापीठातील अनेक प्राध्‍यापकांनी सीएमजे विद्यापीठाचे पी.एचडी पदवी घेतली आहे. त्यासाठी प्राध्‍यापकांनी पैसे मोजले आहे. तसेच दररोज नवीन माहिती प्रसारमाध्‍यमात प्रसिध्‍द होत आहे.

काय आहे प्रकरण?
सीएमजे या खासगी विद्यापीठाची स्थापना 2009 साली झाली. मागील काही वर्षांमध्‍ये 10 पी . एचडी मार्गदर्शकांच्या सहाय्याने विद्यापीठाने 434 प्राध्‍यापकांना डॉक्टरेट दिली. विद्यापीठाच्या या प्रगतीबाबत संशय आल्याने मेघालयाचे राज्यपाल आर.एस. मुशाहर यांनी चौकशीचे आदेश दिले.चौकशीत विद्यापीठाच्या अनियमित व नियमबाह्य पीएच.डी देण्‍यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे.

कारवाई करणार
आतापर्यंत बनावट पीएचडी धारकांविषयी पूर्ण माहिती मिळालेली नाही.परंतु अशी पीएचडी धारक आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यांना त्यांच्या पदावरून हटवण्‍यात येईल.
डॉ. विलास सपकाळ, कुलगुरू, रातुम