आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बनावट कागदपत्रांच्या आधारे विकले हजारो सिमकार्ड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - सोफिया प्रकल्पात कामासाठी आलेल्या परप्रांतीयांना बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड देण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासादरम्यान पुढे आले.


महंमद नसीम अब्दुल रहेमान (28 रा. माहुली जहागिर), विनोद हनुमंत बोरळकर ( 29 रा. सुरवाडी, तिवसा) आणि नितीन सुरटकर (रा. तिवसा) यांना या प्रकरणात अटक केली आहे. सोफिया प्रकल्प परिसरात महंमद नसीम याचे दुकान आहे. तो प्रकल्पात काम करणार्‍या परप्रांतीयांना व अन्य व्यक्तींना कोणतेही कागदपत्र न मागता सिमकार्डची खुलेआम विक्री करीत होता. चौकशीदरम्यान त्याने विनोदचे नाव घेतल्यामुळे पोलिसांनी बुधवारी सुरवाडी येथून विनोदला ताब्यात घेतले. महंमदकडे येणार्‍या सर्व सिमकार्डचा पुरवठा विनोद करीत असल्याची बाब पुढे आली असून महंमदकडून अँक्टिव्हेट झालेले 48 सिमकार्ड जप्त करण्यात आले. तपासादरम्यान विनोदकडून नितीन सुरटकरचे नाव पुढे आल्याने पोलिसांनी गुरुवारी त्यालाही अटक केली. नितीन आणि विनोदचा तिवसा येथे सिमकार्ड विक्रीचा व्यवसाय आहे. पोलिसांनी नितीनकडून अँक्टिव्हेट झालेले सहा सिमकार्ड जप्त केले तसेच एकाच व्यक्तीची 25 ते 30 छायाचित्रे आणि तिचेच अँड्रेसप्रूफ म्हणून वापरण्यात येणारी कागदपत्रे मिळाली आहेत. अशा पद्धतीनेच 50 ते 60 व्यक्तींची छायाचित्रे आणि कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली.


महंमद नसीमला या दोघांकडून अँक्टिव्ह झालेले सिमकार्ड पुरवण्यात येत होते. नसीमने गेल्या दीड महिन्यांत हजारो व्यक्तींना सिमकार्ड विकल्याची बाब उघड झाली आहे. हा गोरखधंदा सुरू असताना प्रशासनाच्या नजरेत आले नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्याच्या तपासासाठी सायबर सेलची मदत घेण्यात आली आहे. तिवसा व परिसरातील अनेक व्यक्तींच्या नावे विकण्यात आलेले सिमकार्ड कोण वापरत आहे, याची जाणीव त्या व्यक्तींनाही नाही. याबाबत शोधासाठी प्रय} सुरू आहे.


50 ते 60 व्यक्तींची छायाचित्रे आणि कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली
25 ते 30 एकाच व्यक्तीची छायाचित्रे आणि तिचेच अँड्रेसप्रूफ म्हणून वापरण्यात येणारी कागदपत्रे मिळाली


कंपन्यांना पत्र देणार
या प्रकरणात हे तिघे प्रमुख दोषी आहेत. मात्र, मोबाइल सिमकार्डवर सुविधा देण्यापूर्वी संबंधित कंपनीने ग्राहकांकडून खात्री करणे आवश्यक आहे. त्यांनी चौकशी केली किंवा नाही, हे पडताळणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर पाच मोबाइल कंपन्यांना पत्र देऊन तपासात मदत घेणार आहे. जे. एन. सय्यद, पोलिस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा