आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Actress Madhu Kambikar Requested To Chief Minister

महिला लोककलावंतांची झोळी मुख्यमंत्र्यांनी रिकामी ठेवू नये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - ‘महिला लोककलावंतांना सरकार एक रुपया देते. त्यांच्यापर्यंत येता येता रुपया बारीक होतो आणि त्यांना 20-25 पैसेच मिळतात. मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, त्यांनी लोककलावंतांची झोळी रिकामी ठेवू नये’, अशी मागणी ज्येष्ठ मराठी अभिनेत्री मधू कांबीकर यांनी शुक्रवारी केली.


तिस-या महिला लोककला संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी संमेलनाध्यक्षा या नात्याने कांबीकर बोलत होत्या. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे होते. जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवताळे, रोहयो मंत्री नितीन राऊत, राज्यमंत्री राजेंद्र मुळक आदींची प्रमुख उपस्थिती होती. ‘महाराष्‍ट्रात पैठणी आणि पुरणपोळीव्यतिरिक्त आवर्जून दाखवावे असे काही नाही, अशी खंत व्यक्त करत लोककलावंतांसाठी कायमस्वरूपी व्यासपीठ हवे,’ अशी आग्रही मागणी सोनाली यांनी केली.


दरम्यान, मुख्यमंत्री भाषणात काही मागण्या मंजूर करतील, ही उपस्थितांची अपेक्षा मात्र फोल ठरली. नव्याने येणा-या महिला लोककलावंतांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण अकादमी सुरू करण्याचा तसेच ग्रामीण भागातील कलावंतांना देश-विदेशातील लोककलांची ओळख व्हावी, यासाठी शैक्षणिक सहली आयोजित करण्याचा प्रयत्न करू, असे चव्हाण या वेळी म्हणाले.