आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत गणोरकर यांचा अर्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा/नागपूर - सासवड येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आता अमरावतीच्या प्रभा गणोरकर व सातार्‍याचे लेखक व प्रकाशक अरुण गोडबोले यांनीही उडी घेतली आहे. या दोघांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या पत्नी असलेल्या गणोरकर यांचे साहित्य विश्वात स्वतंत्र स्थान आहे.