आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरातील मारबत उत्‍सव आणि एका राणीच्‍या फितूरीची गोष्ट...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मारबत उत्‍सव म्‍हणजे नागपूरची एक आगळीवेगळी ओळख. बैलपोळ्याच्‍या दुस-या दिवशी नागपूरातून मारबत मिरवणूक निघते. मारबतीमागे एक इतिहास आहे. एक परंपरा आहे. त्‍या त्‍या वेळचे विषय घेऊन निषेध करणारे बडगे काढले जातात. मारबत जातांना सर्व पिडा घेऊ जाते, अशी श्रद्धा आहे. या बडग्‍यांमध्‍ये प्रतिकात्‍मक निषेध नोंदवून ती पिडा घेऊन जा, अशा घोषणांनी परिसर दमुदमून जातो.

या वर्षी वेगळा विदर्भ, अब्दुल करीम टुंडा, गोध्रा हत्याकांड, एफडीआय, नितीन गडकरी, नरेंद्र मोदी आदी विषयांवर बडगे काढण्यात आले. या वर्षी आठ बडगे व पाच मारबती निघाल्या. पिवळी व काळी मारबत, छोटी पिवळी मारबत, लाल मारबत व पंजाबी ड्रेसवाली मारबत अशा मारबती निघाल्या.

मारबतीचा इतिहास आणि यावर्षीच्‍या मिरवणूकीचे फोटो पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईडवर...